Bakasura Themed Crane Display | 20 फुटी बकासुररुपी बगळ्याचा देखावा लक्षवेधी

श्री देव काशीविश्वेश्वर मंदिर हरिनाम सप्ताहानिमित्त महापुरूष मित्रमंडळाचे आयोजन
Bakasura Themed Crane Display
कणकवली : महापुरुष मित्र मंडळाच्या वतीने साकारलेला वीस फुटी बगळा व तो क्षण.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कणकवली : कणकवली शहरातील श्री काशीविश्वेश्वर मंदिरात वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. शुक्रवारी रात्री महापुरुष मित्रमंडळाने बगळ्यारुपी ‘बकासुराचा वध ’हा चलचित्ररथ देखावा काढला. हा देखावा लक्षवेधी ठरला. देखावा पाहिल्यानंतर अ बबब केवढो मोठो ह्यो बगळो! असे बोल उपस्थितांमधून आपसूक उमटले.

श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात गुरुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला.यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहामुळे शहरपरिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. गेले दोन दिवस विविध मंडळांनी दिंडी व चित्ररथ देखावे काढले. शुक्रवारी महापुरुष मित्रमंडळाने ढोल-तशांच्या गजरात काढलेला बगळ्यारुपी बकासुराचा वध हा चलचित्ररथ देखावा लक्षवेधी ठरला. हा देखावा पाहताक्षणी अ बबब केवढो मोठो ह्यो बगळो, असे बोल उपस्थितांच्या सहजपणे तोंडातून उमटले. सप्ताहाचा पहिला दिवस तेलीआळी मित्रमंडळाने देखावा काढत जागवला.V

Bakasura Themed Crane Display
Kankavali Tree Plantation | पत्रकार संघाचा वृक्ष लागवडीचा उपक्रम स्तुत्य : उमेश तोरस्कर

दुसर्‍या दिवशी महापुरुष मित्रमंडळाने बकासुराचा वध हा चलचित्र देखावा काढून सप्ताहामध्ये रंगत आणली. बाळकृष्णाला गिळंगृत केलेल्या बकासुर रुपी बगळ्याचा वध बाळकृष्ण करतो, यावर हा देखावा होता. हा देखावा पटवर्धन चौक ते काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आला. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा देखावा देखील चित्रीत केला.

Bakasura Themed Crane Display
Kankavali Gramsevak News | कणकवलीत ग्रामसेवकावर सुरीने हल्ला

गुरूवारी होणार नगर प्रदक्षिणा

रविवार 3 ऑगस्ट ला ढालकाठी मित्रमंडळा कडून गजानन महाराज यांच्या वर आधारित देखावा काढला जाणार आहे. तर सोमवार 4 ऑगस्टला जुना मोटर स्टॅड मारुतीआळी, मंगळवार 5 ऑगस्टला बिजलीनगर मित्रमंडळ, बुधवार 6 ऑगस्टला आंंबेआळी मित्रमंडळ असे दिवस जागवले जाणार आहेत. यामुळे शहरात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. गुरुवार 7 ऑगस्टला नगर प्रदक्षिणाने व महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news