

मालवण : संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकारलेल्या हर घर तिरंगा हा उपक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कट्टा येथे भारतीय जनता पार्टी मालवण व कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी 130 फूट लांबीचा भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन ही रॅली वराडकर हायस्कूल- कट्टा बाजारपेठ येथून कट्टा पेट्रोल पंप ते पुन्हा बाजारपेठ येथून वराडकर हायस्कूल येथे अशी फिरविण्यात आली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, संचालक महेश वाईरकर, माजी प. स. सभापती राजू परुळेकर, जगदीश चव्हाण, मिलिंद चव्हाण, संतोष गावडे,जयद्रथ परब, दादा वायंगणकर, पेंडूर सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, तिरवडे सरपंच रेश्मा गावडे, विष्णू लाड, वैष्णवी लाड, अश्निी पेडणेकर, भाजपा महिला तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, मुख्याध्यापिका गावडे मॅडम, समीर चांदरकर, संदीप सरमळकर, बंडू माडये, मामा बांदिवडेकर, आबा पोखरणकर, रुपेश भोजने, मंदार मठकर, तेजस म्हाडगुत, अशोक बिरमोळे तसेच इतर ग्रामस्थ शिक्षक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते.