Water Scarcity | जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष अटळ; भूजल पातळी खालावल्याने प्रशासनाची चिंता वाढली

Water Scarcity | विहिरी व नद्यांची खालावलेली पाणी पातळी संकटाची नांदी; पावसासाठी जनतेचे लागले आकाशकडे डोळे
Water Scarcity
Water ScarcityPudhari
Published on: 
Updated on: 

माखजन : गौरव पोंक्षे
यावर्षी अल निनोच्या भयंकर प्रभावामुळे गणपतीपूर्वी पावसाने राम राम ठोकला. पाऊस आज पडेल, उद्या पडेल अशा आशेवर असलेल्या माणसाचा भ्रमनिरास झाला आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे, रणरणत्या उन्हामुळे भूजल पातळी लक्षणीय खालावली आहे. पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आटल्या असल्याने नद्या कोरड्या पडायला लागल्या आहेत. यामुळे यावर्षी जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष अटळ असल्याची चाहूल प्रकर्षाने लागली आहे.

Water Scarcity
Jalgaon water scarcity news|वरुणराजाने पाठ फिरवली अन् जळगाव जिल्ह्याची ‘तहान’ वाढली; भूजल पातळी तब्बल १.४० मीटरने खालावली!

सरासरी ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या महिन्यात परतीचा पाऊस बरसल्याने विहिरी तुडुंब भरलेल्या असतात, नद्या, गावागावातील ओढे काठोकाठ वाहत असतात, परंतु सध्याची विहिरींची आणि नद्यांची खालावलेली पाणी पातळी ही पाणी संकटाची नांदी आहे. सध्या विहिरींनी गाठलेली पाण्याची पातळी ही दरवर्षीच्या तुलनेत मे महिन्यात पाहायला मिळते.

मात्र यावर्षी ऑक्टोबरमध्येच एवढी भूजल पातळी खालावली तर पुढच्या महिन्याचे काय? असा मोठा प्रश्न सध्या सर्वांसमोर पडला आहे. विहिरी आणि नद्यांची स्थिती पाहता कूपनलिकांचे यापेक्षा वेगळे नाही. सध्या जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर वनराई बंधारे घालण्याचे मिशन सुरू आहे. ते नेमके फोटोबाजीवारासाठी की पाणी अडवण्यासाठी हा भाग वेगळा, पण अनेक ठिकाणी त्या बांधांमध्ये किती पाणी अडवले जाते, किती उंची ठेवली जाते? असे अनेक प्रश्न आहेत.

काहीठिकाणी बंधारा घातल्यावर थोड्याच वेळेत बांधावरून पाणी वाहून जात आहे, तर काही ठिकाणी तर ओढ्यातील पाणी आटल्याने बांधायात विशेष पाणी साठलेले नाही.
ग्रामीण भागात विहिरींची जशी स्थिती आहे तशी चिपळूण, रत्नागिरीसारख्या शहरातील कूपनलिकांची आहे. आज अनेक सोसायटीच्या कूपनलिकेवर अवलंबून आहेत. एक कूपनलिका सोसायटीतील एवढ्या कुटुंबांची खरंच तहान भागवेल का, हा प्रश्न आहे.

गणपतीपूर्वी, गोकुळ अष्टमीनंतर पावसाचा जोर पुरता ओसरला. त्यानंतर पावसाने मागे वळूनदेखील पाहिले नाही. आज पडेल, उद्या पडेल, सर्वपित्री अमावस्याला पडेल, पुढे नवरात्रात पडेल अशी भार्बडी आशा ठेवलेल्या माणसाचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. असलेलं पाणी जपून वापरलं तरी निसर्गात वाढलेल्या तापमानामुळे भूजल पातळी खाली जायची थांबत नाही.

Water Scarcity
Ratnagiri  Water Scarcity : पाण्यासाठी आतापासूनच वणवण!

वापरलं नाही तरी आपोआप खडखडाट अटळ आहे, तरीही पाण्याचा अपव्यय टाळणे इष्टच आहे. ग्रामीण भागातील जनतेला अजूनही चार-पाच दिवस चांगला पाऊस पडेल, अशी आशा आहे. एकीकडे मधान भातशेतीला कोकणात पाणी पुरले नाही,

अखेरीस पाऊस अद्याप न झाल्याने कडवा, पावटा, कुळीथ हे कसं होणार या सीमित विवंचनेत असलेल्या माणसाला भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू शकते याची अजून पुसटशी कल्पना नसावी. त्यामुळे सध्या आठ-दहा दिवस सलग पाऊस पडावा अशी प्रार्थना जनतेकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news