

जळगाव:यंदा पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे जळगाव जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या साठ्याने अक्षरशः तळ गाठला आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या (GSDA) सप्टेंबर २०२६ च्या ताज्या अहवालानुसार, संपूर्ण जळगाव जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल १.४० मीटरने खालावली आहे. जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पाण्याची पातळी वाढलेली नसून, सर्वच्या सर्व १५ तालुक्यांमध्ये पाणी खोल गेल्याचे निष्पन्न झाले आहे. पावसाळा संपताच भूजलाची ही दयनीय अवस्था झाल्याने आगामी उन्हाळ्यात संपूर्ण जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागण्याची धोक्याची घंटा वाजली आहे.
पाच वर्षांची सरासरी ५.४७ मीटर, आता पाणी ६.८७ मीटरवर!
भूजल विभागाच्या निरीक्षण विहिरींच्या आकडेवारीनुसार, गेल्या ५ वर्षांत सप्टेंबर महिन्यातील भूजलाची सरासरी पातळी ५.४७ मीटर नोंदवली गेली होती. मात्र, सप्टेंबर २०२६ मध्ये हीच पातळी ६.८७ मीटर खोल गेली आहे. म्हणजेच अवघ्या वर्षभरात १.४० मीटरने पाणीपातळीत घट झाली आहे. याशिवाय जिल्ह्यातील १६६ निरीक्षण विहिरींपैकी ११ विहिरी कोरड्या पडल्याचे/ढासळल्याचे (Collapsed) समोर आले आहे, जे भूगर्भातील पाणी उपशाचे भयावह वास्तव अधोरेखित करते.
तालुकानिहाय भूजल पातळीची धक्कादायक आकडेवारी (मीटरमध्ये):
अ. क्र.
तालुका
१ बोदवड
३.०६. मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
५.९७ सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-२.९१ घट / फरक (मीटर)
२ मुक्ताईनगर
७.५६. मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
९.४४ सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-१.८८
३ यावल
१७.१८. मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
१९.०३ सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-१.८६घट / फरक (मीटर)
४ जामनेर
३.१२ मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
४.९३ सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-१.८१घट / फरक (मीटर)
५ जळगाव
९.७१ मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
११.३४ सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-१.६३घट / फरक (मीटर)
६ चोपडा
७.९६ मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
९.३० सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-१.३५घट / फरक (मीटर)
७ चाळीसगाव
२.८८ मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
४.१६ सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-१.२८घट / फरक (मीटर)
८ भडगाव
२.१२ मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
३.३६. सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-१.२४घट / फरक (मीटर)
९ एरंडोल
१.९० मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
३.०८. सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-१.१७घट / फरक (मीटर)
१० अमळनेर
३.३४ मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
४.४५. सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-१.१२घट / फरक (मीटर)
११ पारोळा
१.८४. मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
२.९१. सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-१.०८घट / फरक (मीटर)
१२ भुसावळ
३.५१. मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
४.५७. सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-१.०६घट / फरक (मीटर)
१३ धरणगाव
३.०२ मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
४.०१. सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-०.९९घट / फरक (मीटर)
१४ पाचोरा
२.२५ मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
३.११ सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-०.८५घट / फरक (मीटर)
१५ रावेर
१२.६३ मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
१३.४१सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-०.७८घट / फरक (मीटर)
जिल्हा सरासरी
५.४७ मागील ५ वर्षांची सरासरी (सप्टेंबर)
६.८७ सप्टेंबर २०२६ मधील पातळी
-१.४०घट / फरक (मीटर)
बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यांना सर्वाधिक फटका
जिल्ह्यात सर्वाधिक घसरण बोदवड तालुक्यात झाली असून तेथे पाणीपातळी तब्बल २.९१ मीटरने खोल गेली आहे. त्यापाठोपाठ मुक्ताईनगर (-१.८८ मीटर), यावल (-१.८६ मीटर), जामनेर (-१.८१ मीटर) आणि जळगाव तालुक्यात (-१.६३ मीटर) भूजलाने तळ गाठला आहे. केळीचे आगार मानल्या जाणाऱ्या यावल आणि रावेर पट्ट्यात आधीच पाणीपातळी १३ ते १९ मीटरच्या खोलवर गेलेली असताना, त्यात आणखी भर पडल्याने बागायतदार आणि शेतकरी संकटात सापडले आहेत.
प्रशासनाचे नियोजन कागदावरच; आता तरी पावले उचलणार का?
अपुरा पाऊस आणि भूजलाचा अनिर्बंध उपसा यामुळे ऑक्टोबर महिन्यातच जर भूजल पातळीची ही अवस्था असेल, तर ऐन उन्हाळ्यात (मार्च ते मे) ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण भटकंती अटळ मानली जात आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आणि पिकांच्या सिंचनाचा गंभीर प्रश्न उभा ठाकणार असल्याने जिल्हा प्रशासनाने आतापासूनच पाणीटंचाई कृती आराखडा कागदावरून प्रत्यक्ष जमिनीवर उतरवून काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.