Rainfall Alert | ओसरलेला पाऊस दोन दिवसांत होणार सक्रिय, कोकणात यलो अ‍ॅलर्ट

Rainfall Forecast
Rainfall Forecast

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर ओसरलेला आहे. आगामी दोन दिवस पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा यलो अ‍ॅलर्ट रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जारी करण्यात आला आहे. (Rainfall Alert)

बंगालच्या उपसागरात साडेतीन किमी अंतरावर चक्राकार वार्‍याची स्थिती निर्माण झाली आहे. तर अरबी सागरातही कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने कोकण किनारपट्टी भागात पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्याच्या प्रभावाने किनारपट्टीतील जिल्ह्यात पुढील दिवसांत पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली झाली. या पार्श्वभूमीवर येत्या 48 तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण आणि गोव्यात बर्‍याच ठिकाणी मुसळधार, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस, पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने नमूद केले आहे. (Rainfall Alert)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news