Minor Girl Assault Case | वैभववाडी हादरली! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडिओ बनवला; नेर्ले येथील तिघांना अटक

Minor Girl Assault Case | वैभववाडी-नेर्ले येथील दोन व राजापूर - ताम्हाणे येथील एक मिळून तिघांना अटक
Minor Girl Assault Case |
Minor Girl Assault Case | कॅफेमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंदPudhari File Photo
Published on
Updated on

वैभववाडी : पुढारी वृत्तसेवा

परजिल्ह्यातील एका १७ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि त्याचे व्हिडिओ बनवून बदनाम करण्याची धमकी दिल्याप्रकरणी नेर्ले येथील दोघे तर ताम्हाणे येथील एक, अशा तिघांवर वैभववाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांना सोमवारी अटक केली. हा प्रकार १ जुलै २०२५ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत झाला आहे.

Minor Girl Assault Case |
Konkan Cashew Crop Damage 2026 | हापूसनंतर आता काजूही संकटात! कोकणात उत्पादनात 70 टक्क्यांपर्यंत घट; बागायतदार हवालदिल

अटक करण्यात आलेल्यांमध्ये मयुर सुर्वे, ओंकार पंढरी सुर्वे, (दोघेही रा. नेर्ले, ता. वैभववाडी), पंकज पवार (रा. ताम्हाणे -बौध्दवाडी, ता. राजापुर) अशी या संशयितांची नावे आहेत. जिल्ह्याबाहेरील अल्पवयीन तरुणीची तालुक्यातील नेर्ले येथील ओंकार सुर्वे या तरुणाशी ओळख झाली.

या ओळखीनंतर ती तरुणी ओंकार व मयुर या संशयितांसोबत दुचाकीवरून तालुक्यातील एका पर्यटनस्थळावर आली होती. पर्यटनस्थळी उशिर झाल्याने तिला घरी जाण्यासाठी वाहन उपलब्ध झाले नाही. त्यामुळे त्या दोघांनी तिला आपल्या नेर्ले येथील घरी नेले. तेथे एका संशयिताने सुरूवातीला तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने त्याला विरोध केला. त्यानतंर दुसऱ्या संशयिताने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ते करताना त्याचे चित्रीकरण त्याने केले.

Minor Girl Assault Case |
Soldier Ends Life | सुट्टीवर आलेल्या जवानाची गळफास घेत आत्महत्या

या चित्रीकरणाच्या आधारे तिघांपैकी एक जण त्या युवतीला बदनामी करण्याची धमकी देऊ लागला. तसेच ते चित्रिकरण व्हायरल करण्याची धमकी देत होता. चित्रीकरण केलेला व्हिडीओ १४ मार्चला संशयिताने त्या युवतीच्या मोबाईलवर पाठविला. त्यामुळे ती युवती भयभीत झाली. तिने सोमवारी तिच्या कार्यक्षेत्रातील पोलिस स्थानकात त्या तिघांविरोधात तक्रार दाखल केली.

ही तक्रार अधिक तपासाकरीता वैभववाडी पोलिसांना प्राप्त झाली. या गंभीर प्रकारामुळे पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू केला. या गुन्ह्यातील तिन्ही संशयितांना पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, हवालदार रणजीत सावंत, किरण मेथे यांनी अटक केली. या घटनेची माहिती मिळाल्यावर अति. पोलीस अधीक्षक नयोनी साटम, कणकवली विभागाचे पोलिस उपअधीक्षक घनश्याम आढाव वैभववाडीत दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच फॉरेन्सीक पथक नेर्ले येथे दाखल झाले. त्यांनीही घटनास्थळाची तपासणी केली. संशयितांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news