Uday Samant : आम्ही फडणवीस यांना सवाल केले तर चालेल?

उद्योगमत्री मंत्री उदय सामंत यांचा भाजपला सवाल
Uday Samant
Uday SamantPudhari
Published on: 
Updated on: 

रत्‍नागिरी : आम्‍ही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्‍न विचारले तर चालतील का किंवा त्‍यांना सल्‍ला देऊ शकतो का, असा प्रश्‍न शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भारतीय जनता पक्षाला केला.

भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्‍न विचारण्‍याचा अधिकार आहे का? खरे तर बन यांनी उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्‍ला देऊ नये, असे स्‍पष्‍ट मत सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्‍यक्‍त केले.

Uday Samant
Monterosa Project Pune: बिल्डर, आर्किटेक्टसह दोन अभियंत्यांवर कारवाईचा बडगा; 'माँटेरोझा' गृह प्रकल्पाला महापालिकेचा दणका

एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर आम्‍हीही अमित शहा यांची भेट घेऊ, असेही त्‍यांनी सांगितले.रत्‍नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री सामंत म्‍हणाले की, पुण्‍यात धंगेकर काय म्‍हणाले, याच्‍याशी पक्षाचा काहीही संबंध नाही, ते त्‍यांचे वैयक्‍तिक मत आहे. पुण्‍यामध्‍ये आम्‍ही मैत्रीपूर्ण लढतीला पाठिंबा दिला. त्‍या ठिकाणी काहींनी कोण सचिन सानप, असे विचारले. त्‍या सर्वांनाच सानप यांनी तीन दिवस जागे ठेवून दाखवून दिले.

एखाद्याचे खच्‍चीकरण करणे योग्‍य नाही. ते दुसर्‍या नंबरवर राहिले. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्‍याशी व भाजपचे उमेदवार कौस्‍तुभ गावडे यांच्‍याशीही चर्चा सुरू होती. पुणे मतदारसंघाची पार्श्वभूमी वेगळी होती. नवनाथ बन हे उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्‍ला देण्‍याएवढे व प्रश्‍न विचारण्‍याएवढे मोठे नाहीत. आम्‍ही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्‍न विचारू शकतो का किंवा सल्‍ला देऊ शकतो का? बन यांना निवडणुकीतील वस्‍तुस्‍थिती माहिती नसावी. म्‍हणून ते बोलत असावेत.

Uday Samant
Mahayuti Alliance Dispute : मित्रपक्षाच्या हव्यासापायी तीन जागा गमावल्या

राज्‍यात महायुतीची ताकद आहे. मात्र ज्‍या जागा पडल्‍या, त्‍याबाबत आत्‍मचिंतन करू. महायुतीमध्‍ये गैरसमज होऊ नये, अशी भूमिका होती; तर मित्रपक्ष दुखावला गेला नाही पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांची भूमिका होती. गोकुळची सत्ता ही समन्‍वयाच्‍या अभावातून गेली, याकडेही उदय सामंत यांनी भाजपचे लक्ष वेधले आणि शिंदे गटाचा किल्ला लढवला.

उपमुख्‍यमंत्री शिंदेंनी आदेश दिले तर अमित शहांची भेट घेऊ

भाजप नेते अमित शहांची भेट घेणार असल्‍याची चर्चा असल्‍याच्‍या प्रश्‍नावर मंत्री सामंत यांनी उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले तर शिवसेनेच्‍या तीन-चार मंत्र्यांसह अमित शहा यांची भेट घेऊ. यावेळी आम्‍ही तक्रार करणार नाही, असा टोलाही भाजपच्‍या पदाधिकार्‍यांना लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.