Ratnagiri accident: भाट्ये येथे दोन बससह क्रेटा कारचा भीषण अपघात; विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती

या अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे
Ratnagiri accident: भाट्ये येथे दोन बससह क्रेटा कारचा भीषण अपघात; विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती
Published on
Updated on

रत्नागिरी : शहरानजीक भाट्ये येथे दोन बसची समोरासमोर जोरदार धडक बसून जोरदार भीषण अपघात झाला. तर बसमागे असलेली क्रेटा कारही बसवर आदळली. यातील एक बस आंबोळगडहून रत्नागिरीच्या दिशेने येत होती दरम्यान हा अपघात झाला. बसमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने होते. काही विद्यार्थी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

Ratnagiri accident: भाट्ये येथे दोन बससह क्रेटा कारचा भीषण अपघात; विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती
Ratnagiri Accident : कुवारबावमध्ये तीन डंपरचा विचित्र अपघात

हा अपघात सकाळी 7 च्या सुमारास झाला आहे. अपघातानंतर भाट्ये येथील नागरिकांनी पुढे येत जखमी मुलांना बसमधून बाहेर मधून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. क्रेटा कार ही डॉ.गोडसे यांची होती. मुलीला शाळेत सोडण्यासाठी ते जात असताना हा अपघात झाला.

Ratnagiri accident: भाट्ये येथे दोन बससह क्रेटा कारचा भीषण अपघात; विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती
Ratnagiri Accident : दापोली-खेड मार्गावर दुचाकी घसरून तरुणीचा मृत्यू

यामध्ये त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र कारमधील सर्वजण सुखरूप आहेत. जखमींना माजी सरपंच पराग भाटकर, पप्या भाटकर व ग्रामस्थांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news