Ratnagiri Accident : दापोली-खेड मार्गावर दुचाकी घसरून तरुणीचा मृत्यू

जखमी मैत्रिणीवर रुग्णालयात उपचार सुरू
Ratnagiri Accident News
दापोली-खेड मार्गावर दुचाकी घसरून तरुणीचा मृत्यू
Published on
Updated on

दापोली : दापोली-खेड मार्गावरील वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्‍या भीषण अपघातात सेजल (संदीप) पांडुरंग भागवत (वय २२, मूळ रा. टेटवली-खुटाचा कोंड, सध्या विद्यापीठ चाळ, दापोली) हिचा मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण वैष्णवी चंद्रकांत आयरे (मूळ रा. असोंड, सध्या विद्यापीठ चाळ, दापोली) ही जखमी झाली असून तिच्यावर दापोली येथे उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघी तरुणी मंगळवारी सकाळी आपल्या मूळ गावी दुचाकीवरून जात असताना वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने त्यांची दुचाकी घसरली. त्यामुळे दोघीही रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या. या अपघातात सेजल रस्त्यालगतच्या नाल्यात पडली. नाल्यातील पाणी नाका-तोंडात गेल्याने तिची प्रकृती गंभीर झाली, तर वैष्णवी जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news