

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील मोरवंडे गावाजवळ रविवारी (दि. २६) मध्यरात्रीच्या सुमारास भाजी वाहतूक करणारा टेम्पो सुमारे ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात चालक आणि त्याच्यासोबत प्रवास करणारा सहकारी सुखरूप बचावल्याने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथून दापोलीच्या दिशेने भाजीपाला घेऊन जाणारा टेम्पो रविवारी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास मोरवंडे गावाजवळ पोहोचला असता, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो महामार्गालगत असलेल्या सुमारे ३० ते ४० फूट खोल दरीत जाऊन कोसळला.