मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरला टेम्पोची धडक; वेंगुर्लेतील २ तरुण ठार

Ratnagiri Accident News | कामथे हायस्कूलजवळ भीषण अपघात
Accident on Mumbai-Goa highway
मुंबई - गोवा महामार्गावर कामथे हायस्कूलजवळ ट्रेलरला आयशर टेम्पोची जोरदार धडक बसली.Pudhari News Network
Published on
Updated on

चिपळूण, पुढारी वृत्तसेवा: मुंबई - गोवा महामार्गावर कामथे हायस्कूलजवळ एसटी थांब्याच्या ठिकाणी थांबलेल्या ट्रेलरला आयशर टेम्पोची मागून जोरदार धडक बसली. या अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुळचे वेगुर्ले येथील दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला. आज (दि.८) सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाला डुलकी आल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (Ratnagiri Accident News)

Accident on Mumbai-Goa highway
रत्नागिरी : काळ आला होता,पण वेळ आली नव्हती...

रामचंद्र  शेणई याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय

या अपघातात ऋत्विक संतोष शिरोडकर (वय २७, भटवाडा, वेंगुर्ला) व रामचंद्र राजेंद्र शेणई (वय ३०, परबवाडा, वेंगुर्ला) या दोन तरूणांचा दुर्देवी मृत्यू झाला. शेणई हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत होता. काही वर्षापूर्वीच त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. (Ratnagiri Accident News)

Accident on Mumbai-Goa highway
Ratnagiri Railway Station | रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी एमआयडीसीसोबत सामंजस्य करार

टॅम्पोच्या केबीनचा चक्काचूर

याबाबत अधिक माहिती अशी की, कामथे एसटी बस थांबा येथे रस्त्याच्या कडेला ट्रेलर थांबलेला होता. याचवेळी मुंबईकडून गोव्याकडे भरधाव जाणारा आयशर टेम्पो ट्रेलरला मागून जोरदार धडकला. या अपघातात आयशर टॅम्पोच्या केबीनचा चक्काचूर झाल्याने त्यामध्ये दोघेही चिरडले गेले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Accident on Mumbai-Goa highway
रत्नागिरी : गोड्या पाण्यातील मासेमारीला मिळणार चालना

टेम्पोमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतदेह कामथे येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह नातेवाईकांनी वेंगुर्ला येथे नेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news