Sudhir Shinde : खोट्या शपथा घेऊन राजकारण केले नाही

शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नसल्याचा सुधीर शिंदेंचा आरोप
Sudhir Shinde
चिपळूण ः काँग्रेसचे उमेदवार सुधीर शिंदे यांच्यासमवेत जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग व पदाधिकारी.
Published on
Updated on

चिपळूण शहर : काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली 40 वर्षे राजकारण करीत असताना फक्त समाजकारणच केेले. खोट्या शपथा घेऊन मी कधीही राजकारण केले नाही. काँग्रेसमधून सोबत पाच नगरसेवक घेऊन शिंदे सेनेत प्रवेश केला. यावेळी बड्या नेत्यांनी आपल्याला नगराध्यक्षपदासह सोबतच्या नगरसेवकांना उमेदवारी देण्याचे वचन दिले होते. मात्र, ते त्यांनी पाळले नाही, म्हणून आपण सोबतच्या नगरसेवकांसह अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. परंतु सुदैवाने पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडून मला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मिळालेली संधी हे माझ्या विजयाची सुरुवात आणि नशिबाची साथ असल्याची प्रतिक्रिया सुधीर शिंदे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी पुन्हा एकदा लियाकत शाह यांच्यावर कडवट टीका केली.

Sudhir Shinde
Ratnagiri politics : दोन अपक्ष उमेदवारांची न्यायालयात धाव

शहरातील धवल मार्ट येथे झालेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी लियाकत शाह यांच्यावर कडवट टीका केली. त्या म्हणाल्या की, शाह यांची भूमिका पहिल्यापासूनच संशयास्पद होती. ते आम्हाला कुठेही विश्वासात घेत नव्हते.

प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे आमच्यापासून लपवून करीत होते. केवळ त्यांच्यासाठी मित्रपक्षांबरोबर होणारी आघाडी मला मोडावी लागली. मित्रपक्षांजवळ आघाडीबाबत बोलणी सुरू असताना शाह यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा आग्रह धरला. त्यामुळे मित्रपक्षांकडून अनेकवेळा माझ्याशी संपर्क करूनही आपण प्रतिसाद दिला नाही. केवळ शाह यांच्यासाठीच आघाडी मोडावी लागली. मात्र, त्यानंतर शाह यांनीदेखील उमेदवारी अर्ज भरताना अनेक तांत्रिक त्रुटी ठेवत चुका केल्या. त्या देखील सुधारण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यांची ही संशयास्पद भूमिका लक्षात येताच पक्षाचे चिन्ह टिकून राहावे या हेतूनेच सुधीर शिंदे यांना नगराध्यक्ष पदासाठी एबी फॉर्म दिला. ते मूळचे काँग्रेसचे असल्याने उमेदवारी देण्याबाबत विचार केला. शाह यांच्या वागण्याची पक्षाने गंभीर दखल घेतली असून शाह यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या संपूर्ण राजकीय घडामोडींबाबत भाष्य करताना उमेदवार सुधीर शिंदे यांनी सांगितले की, मी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक व उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. त्यानंतर माझ्यासोबतच्या सहा नगरसेवकांना घेऊन मी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यापूर्वी शिंदे सेनेच्या जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांसोबत आमच्या काही बैठका झाल्या. तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. प्रवेश व बैठकीदरम्यान शिंदे सेनेतील नेत्यांनी आपल्याला सोबतच्या नगरसेवकांसह मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले व त्यानुसार काम करा असे सांगितले. मात्र, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शिंदे सेनेने माझ्यासह अन्य नगरसेवकांना उमेदवारी देण्याचा शब्द पाळला नाही. त्यामुळे अखेर आपण नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला.

तसेच नगरसेवक पदासाठी उभे राहाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यानच्या काळात सर्वच राजकीय पक्षात अनेक घडामोडी घडत होत्या. त्यानुसार काँग्रेसमध्येही घडल्या. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्षा घाग यांनी आपल्याला थेट नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकडून संधी देत असल्याचे स्पष्ट करून पक्षाच्या एबी फॉर्मसह उमेदवारी दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार आपण उमेदवारी अर्जही दाखल केला.

दरम्यान हा अर्ज मागे घेण्याची आपली तयारीही होती. मात्र, उमेदवारीवर पक्षाकडून दावा करणारे शाह यांची संशयास्पद भूमिका आणि अर्जातील चुका व त्रुटी यामुळे ते या स्पर्धेतून बाजूला झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपण परगावी गेलो होतो. तरीदेखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मी चिपळुणात येण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अडथळ्यांमुळे मी वेळेत पोहोचू शकलो नाही. नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याची ही संधी मला नशिबाने व नियतीनेच दिली. तसेच मूळ काँग्रेस पक्षातून ही संधी मिळाली. मी माझ्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत खोट्या शपथा घेऊन काम केलेेले नाही. त्याचीच ही पोचपावती असल्याचे शिंदे म्हणाले.

Sudhir Shinde
Ratnagiri News : दरोडेखोरांचा लूटमारीचा प्रयत्न

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news