Ratnagiri politics : दोन अपक्ष उमेदवारांची न्यायालयात धाव

अर्ज अवैध ठरवण्याच्या निर्णयाविरुद्ध दाखल केली याचिका
Ratnagiri politics
दोन अपक्ष उमेदवारांची न्यायालयात धावFile Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील दोन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या अर्ज अवैध ठरवण्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उमेदवार संपदा रसाळ राणा आणि सचिन सदानंद शिंदे या दोन अपक्ष उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Ratnagiri politics
Ratnagiri News : जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांचे चार महिन्यांचे अनुदान थकले

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्र.10 मधील अपक्ष उमेदवार संपदा रसाळ राणा आणि सचिन सदानंद शिंदे यांचे उमेदवारी अर्ज किंवा नामनिर्देशन पत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या रचनेत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचेही अर्ज अवैध ठरवले. उमेदवारी अर्जासोबत दिलेले प्रतिज्ञापत्र नोटरी केलेले नसल्याने दोघांचेही उमेदवारी अर्ज बाद ठरवले गेले. 18 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली, त्यावेळी या दोन्ही अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दोन्ही अपक्ष उमेदवारांनी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 15 नुसार न्यायालयात अपिल दाखल केले आहे. या अपिलात त्या प्रभागातील उमेदवार श्वेता कोरगावकर, मानसी करमरकर, राजेश तोडणकर आणि राजाराम रहाटे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

Ratnagiri politics
Ratnagiri News : गर्डरचे काम रखडले; वाहनचालक त्रस्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news