

Konkan Ratnagiri Sangameshwar Traffic News Updates
संगमेश्वर : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर शास्त्री पुलानजीक रिक्षावर दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक जवळपास तासभरापेक्षा अधिक काळ विस्कळीत झाली.मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत चहुबाजूनी ओरड सुरू असतानाच महामार्ग ठेकेदार कंपनीच्या बेशिस्त वाहतूक प्रकरणी ८ डंपरवर संगमेश्वरच्या पोलिसांनी कारवाई केली आहे.
चौपदरीकरणाचे काम करताना वाहतुकीस होत असलेल्या अडथळ्याबाबत आधीच ओरड सुरू आहे. अशातच शनिवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील शास्त्रीपुलाजवळ चिपळूणहून संगमेश्वरकडे जाताना डाव्या बाजूला असलेली दरड अचानक कोसळली. ही दरड रिक्षावर पडल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
या दुर्घटनेत जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, साडेआठ वाजल्यापासून पुढे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या या घटनेमुळे महामार्गावर शास्त्री पुलापासून मागे संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनपर्यंत महामार्गावरील वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.अशीच परिस्थिती संगमेश्वर येथून चिपळूणकडे जाणाऱ्या दिशेने होती. रस्त्यावर कोसळलेली दरड तसेच रिक्षा बाजूला केल्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरू करण्यात आली.