Ratnagiri News : वाशिष्ठी नदीतच गोल रिंगण करून दिला बाप्पाला निरोप

डोक्यावर बाप्पाची मूर्ती अन् नदीच्या पात्रात जयघोष
Ratnagiri News
वाशिष्ठी नदीतच गोल रिंगण करून दिला बाप्पाला निरोप
Published on
Updated on

चिपळूण शहर : चिपळूण शहरातील उपनगर गोवळकोट येथे गोवळकोटवासीय गणेशभक्तांनी यंदा आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. गोवळकोट गावातून प्रवाहीत होणार्‍या वाशिष्ठी नदी विसर्जन घाटावर गौरी-गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी गणेशमूर्ती डोक्यावर घेऊन थेट वाशिष्ठी नदीपात्रात शेकडोंच्या संख्येने उतरून गोल रिंगण करून बाप्पाचा जयघोष आणि जयजयकार करीत निरोप देण्याची आगळीवेगळी संकल्पना राबवली.

गोवळकोट आणि गणेशोत्सव यांचे आगळेवेगळे व पारंपरिक पद्धतीने रूढ नाते टिकून आहे. याठिकाणी गणपती आगमन, गौरी आगमन व गणेशमूर्ती विसर्जन गावातून एकाचवेळी, वाजतगाजत शेकडोंच्या संख्येने आणि वाडीवाडीतील घराघरातून लाडक्या गणरायाला आपल्या डोक्यावरून विसर्जन घाटावर नेत बाप्पा निरोप देण्याची अनेक वर्षांची परंपरा जपली आहे. गावातील वाडीवस्तीपासून प्रत्येक घरातील शेकडो गणपती एकाचवेळी एकत्रितपणे शिस्तबद्ध पद्धतीने, वाजतगाजत आणि बाप्पाच्या जयघोषात विसर्जनाला नेण्यात येतात.

यंदा मात्र वाशिष्ठी नदीच्या विसर्जन घाटावर लाडक्या गणरायाचा विसर्जन सोहळा वेगळ्याच पद्धतीने झाला. शेकडो गणेशभक्तांनी गणरायाची मूर्ती डोक्यावर घेत थेट नदीपात्रात उतरून त्या पात्रामध्ये गोल रिंगण करून गणरायाची मनोभावे आराधना व जयघोष करीत गणेशमूर्तींचे विसर्जन केले. यावेळी विसर्जन घाटावर चिपळूण परिसरासह गोवळकोट येथील भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी भाविकांचा उत्साह वखाणण्याजोगा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news