Ratnagiri News : तीन वर्षांच्या चिमुरडीला मिळाले नवे हास्य

दुभंगलेले ओठ व टाळूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया
Ratnagiri News
तीन वर्षांच्या चिमुरडीला मिळाले नवे हास्य
Published on: 
Updated on: 

चिपळूण : शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत चिंचघरी आग्रेवाडी अंगणवाडीतील तीन वर्षांची चिमुरडी हर्षाली सीताराम मोरे हिला नवीन हास्य मिळाले आहे. तपासणीदरम्यान तिच्यामध्ये ‘दुभंगलेले ओठ आणि टाळू’ (क्लेफ्ट लिप व पॅलेट) हा जन्मजात दोष आढळून आला होता. त्यानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या समन्वयातून डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटलच्या योजनेंतर्गत तिच्यावर यशस्वी व मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेनंतर या लहानग्या लाभार्थीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जिल्हा व तालुका आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यतीन मयेकर, डॉ. गायत्री फडके, अंगणवाडी पर्यवेक्षिका हल्ये आदी उपस्थित होते.

अधिकार्‍यांनी हर्षालीच्या आरोग्याची सविस्तर पाहणी करून तिच्या पुढील देखभालीबाबत पालकांना आवश्यक मार्गदर्शन केले. वेळेवर झालेली तपासणी आणि तत्पर वैद्यकीय उपचारांमुळे चिमुकल्या हर्षालीच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य फुलल्याने तिच्या कुटुंबीयांनी आरोग्य विभाग व शासनाच्या या अभियानाप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news