Ratnagiri Cyber Fraud News | फेसबुकवर रिल्सच्या नादी लागून वृद्धाने गमावले 9 लाख रुपये

Ratnagiri Cyber Fraud News | रत्नागिरीतील भाटिमिऱ्या परिसरातील घटना
Mobile
Mobile Pudhari
Published on
Updated on

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

फेसबुकवरील रिल्सच्या नादी लागून वृद्धाने ९ लाख २१ हजार ७०१ रुपये गमावल्याची घटना शहरातील भाटिमिऱ्या परिसरात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अमित चव्हाण (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mobile
Ratnagiri Heatwave Alert | रत्नागिरीकरांनो सावधान! जिल्ह्यात उन्हाचा पारा 41 अंशांवर; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

त्याच्याविरोधात हेमंत मारुती शिवलकर (वय ७१, रा. नवीन दत्तमंदिर भाटिमिऱ्या, रत्नागिरी) यांनी मंगळवारी दिलेल्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत त्यांनी फेसबुकवर रिल्स आणि जाहिराती पाहताना त्यांची संशयित अमित चव्हाणशी ओळख झाली होती.

फिर्यादीचा विश्वास संपादन केल्यानंतर अमितने फिर्यादीला ५ रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चित्र असल्यास १५ लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवले होते. शिवलकर यांना ती १५ लाखांची रक्कम देण्यासाठी संशयिताने त्यांच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये तसेच गुगल पेच्या माध्यमातून तब्बल ९ लाख २१ हजार ७०१ रुपये लाटले.

Mobile
Palghar temperature : जिल्ह्यात उकाड्याचा कहर; 34 अंशांवर तापमान, घामाच्या धारांनी नागरिक हैराण

तसेच फिर्यादीच्या नावे असलेल्या बँक खात्यांचा वापर करून त्यामध्ये इतर लोकांना फसवून त्यांची रक्कम फिर्यादीच्या बँक खात्यात जमा करून नंतर ती काढून घेतली असल्याचे वृत्त आहे. शिवलकर हे वयोवृद्ध असल्याने व नियमितपणे बँकेत आपल्या खात्याची माहिती घेण्यासाठी जात नसल्याने अडीच महिन्यांनंतर बँकेकडून माहिती घेतल्यानंतर हा सर्व फसवणुकीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news