Palghar temperature : जिल्ह्यात उकाड्याचा कहर; 34 अंशांवर तापमान, घामाच्या धारांनी नागरिक हैराण

अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने परिस्थिती अधिक गंभीर
Palghar temperature
जिल्ह्यात उकाड्याचा कहर; 34 अंशांवर तापमान, घामाच्या धारांनी नागरिक हैराणpudhari photo
Published on
Updated on

विरार ः जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा वाढत असून 34 अंशापर्यंत पोहचला आहे. कडक उन्हामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक, शेतकरी तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यावर वर्दळ कमी झाल्याचे चित्र असून बाहेर पडणेही नागरिकांना कठीण होत आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागली होती, मात्र एप्रिलमध्ये उष्णतेने विक्राळ रूप धारण केले आहे. 34 अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे केवळ माणसांनाच नव्हे तर जनावरे आणि पक्ष्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उकाड्यामुळे अंगातून सतत घामाच्या धारांचा वर्षाव होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.

Palghar temperature
War impact: युद्धाचा वणवा जलसाठ्यांकडे...

दरम्यान,ग्रमीण सह शहरी भागातही वाढती लोकसंख्या आणि मर्यादित सुविधा यामुळे पाणीपुरवठा व इतर सोयींवर ताण निर्माण झाला आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढली असून पुरवठा अपुरा पडत आहे. परिणामी, उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या हंगामावरही उकाड्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. विवाह सोहळे, मंगल कार्यालये, हॉटेल्स तसेच घरगुती कार्यक्रमांमध्ये घामाच्या धारांमुळे उपस्थितांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वधू-वरांसह पाहुण्यांनाही उष्णतेचा मोठा फटका बसत असून काही ठिकाणी कार्यक्रमांची वेळ बदलण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ होताना दिसत आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा, चक्कर येणे अशा समस्या वाढल्या आहेत. त्यातच रस्त्यांवरील कामांमुळे उडणारी धूळ आणि गरम वारे यामुळे त्रासात अधिक भर पडत आहे. एकूणच, 34 अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे वसई तालुक्यातील जनजीवन प्रभावित झाले असून नागरिक आता लवकरात लवकर पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

विरार ः पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा वाढत असून 34 अंशापर्यंत पोहचला आहे. कडक उन्हामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक, शेतकरी तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यावर वर्दळ कमी झाल्याचे चित्र असून बाहेर पडणेही नागरिकांना कठीण होत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागली होती, मात्र एप्रिलमध्ये उष्णतेने विक्राळ रूप धारण केले आहे. 34 अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे केवळ माणसांनाच नव्हे तर जनावरे आणि पक्ष्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

उकाड्यामुळे अंगातून सतत घामाच्या धारांचा वर्षाव होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. दरम्यान,ग्रमीण सह शहरी भागातही वाढती लोकसंख्या आणि मर्यादित सुविधा यामुळे पाणीपुरवठा व इतर सोयींवर ताण निर्माण झाला आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढली असून पुरवठा अपुरा पडत आहे. परिणामी, उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या हंगामावरही उकाड्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.

Palghar temperature
Mahavitaran News : महावितरणची जिल्हाभरात अघोषित 'लोडशेडिंग'

विवाह सोहळे, मंगल कार्यालये, हॉटेल्स तसेच घरगुती कार्यक्रमांमध्ये घामाच्या धारांमुळे उपस्थितांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वधू-वरांसह पाहुण्यांनाही उष्णतेचा मोठा फटका बसत असून काही ठिकाणी कार्यक्रमांची वेळ बदलण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ होताना दिसत आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा, चक्कर येणे अशा समस्या वाढल्या आहेत. त्यातच रस्त्यांवरील कामांमुळे उडणारी धूळ आणि गरम वारे यामुळे त्रासात अधिक भर पडत आहे. एकूणच, 34 अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे वसई तालुक्यातील जनजीवन प्रभावित झाले असून नागरिक आता लवकरात लवकर पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news