रत्नागिरी: संगमेश्वर येथील पोलिस नाईक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

संगमेश्वर पोलीस ठाण्यातील पोलिस नाईक स्वप्नील जाधव यांचे  हृदयविकाराने निधन झाले.
संगमेश्वर पोलीस ठाण्यातील पोलिस नाईक स्वप्नील जाधव यांचे हृदयविकाराने निधन झाले.
Published on
Updated on

देवरुख; पुढारी वृत्तसेवा: संगमेश्वर पोलीस ठाण्यातील पोलिस नाईक स्वप्नील जाधव यांचे रविवारी (दि.२) दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते. जाधव यांना दुपारी हृदयविकाराचा झटका आला. रत्नागिरी येथे उपचार करुन पुढील उपचारासाठी कोल्हापूराला नेत असताना दख्खीण येथे त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जाधव हे अनुकंपाखाली १० वर्षांपूर्वी पोलीस सेवेत रुजू झाले होते. ते दोन वर्षापूर्वी संगमेश्वर पोलिस ठाण्यात बदलीने आले होते. रविवारी कामावर असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या  ताब्यात देण्यात आला. जाधव यांच्या मुळगावी रत्नागिरी मिर्या येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जाधव यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news