Ratnagiri Crime News | राजापुरात महिलेवर अत्याचार, संशयित शिक्षकाला अटक

Ratnagiri Crime News | राजापुरात महिलेवर अत्याचार, संशयित शिक्षकाला अटक
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

नाटे : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एका महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शिक्षकाचा सहभाग समोर आल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

याप्रकरणी नाटे (सागरी) पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा संशयित शिक्षकाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयित शिक्षकाचे नाव रामनाथ नारायण वाकडे असे असून, तो परिसरातील एका नामांकित हायस्कूलमध्ये शिक्षक आहे. समाजात आदर्श मानल्या जाणाऱ्या शिक्षकाकडूनच अशा प्रकारचे कृत्य घडल्याने शिक्षणक्षेत्रावरच प्रश्नचिन्ह संशयित शिक्षकाला अटक निर्माण झाले आहे.

Arrested
Maharashtra Teachers Salary: मोठी बातमी! ई-केवायसी नसल्यास शिक्षकांना नाही मिळणार एप्रिलचा पगार

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला २० व २१ एप्रिल रोजी आडिवरे-रुंडे येथील काजू बागेत कुंपणासाठी खड्डे खोदण्याचे काम करत होती. याचदरम्यान संशयित शिक्षकाने तिला एकटी गाठून जबरदस्तीने अत्याचार केला. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देत गप्प राहण्यास भाग पाडले.

Arrested
देवरुखात मुंबईचा आंबा! नात्यांचा, मातीतल्या प्रेमाचा गोड सुगंध

अखेर पीडित महिलेने नाटे (सागरी) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत रात्रीतून शोधमोहीम राबवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news