Rajapur Corporator Disqualified | जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने राजापूरच्या नगरसेविका अफरोज झारी यांचे सदस्यत्व रद्द

महाविकास आघाडीचे संख्याबळ घटले; नगर परिषदेत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
Fake Caste Certificate
Fake Caste CertificatePudhari
Published on
Updated on

Rajapur Municipal Council Afroz Zhari Caste Certificate

राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या डिसेंबर २०२५ मधील सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ (अ) मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका अफरोज महमंद झारी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांचे इतर मागास वर्ग (नाभिक) जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाने सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जारी केले. त्याबाबतचे पत्र बुधवारी (२९ जुलै) राजापूर नगर परिषदेला प्राप्त झाले असून त्यामुळे नगर परिषदेतील एक जागा रिक्त झाली आहे.

यापूर्वी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अफरोज झारी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. विशेष म्हणजे, त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या निलोफर मुकादम यांचेही जात प्रमाणपत्र समितीने अवैध घोषित केले होते.

Fake Caste Certificate
Ratnagiri News| माचाळ पर्यटन येथील उलटा धबधब्‍यावर संरक्षक कठडा उभारा

जात पडताळणी समितीच्या निर्णयानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरसेविका अफरोज झारी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश राजापूर नगर परिषदेला पाठविले. हे पत्र बुधवारी नगर परिषद प्रशासनाला प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

राजापूर नगर परिषदेत सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षांसह महाविकास आघाडीकडे १० नगरसेवक आणि एक स्वीकृत सदस्य असे संख्याबळ आहे. तर विरोधी महायुतीकडे १० नगरसेवक आणि एक स्वतंत्र स्वीकृत सदस्य असे एकूण ११ सदस्य आहेत. अफरोज झारी यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने महाविकास आघाडीचे संख्याबळ घटले असून नगर परिषदेतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Fake Caste Certificate
Rajapur Municipal Council | राजापूर नगरपालिकेत खळबळ; काँग्रेस नगरसेविकेचे जातप्रमाणपत्र अवैध

या पार्श्वभूमीवर आगामी काळात काही महत्त्वाच्या विषयांवरील निर्णय घेताना नगराध्यक्षांना कास्टिंग व्होटचा वापर करावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच रिक्त झालेल्या जागेसाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि पोटनिवडणुकीकडेही आता लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news