

खेड : तालुक्यातील एका गावातील पोस्टमास्तरने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला आरडीचे लिखाण करण्यासाठी बोलावून तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेत पीडित मुलगी गर्भवती राहिली असून आरोपी पोस्टमास्तर नरेश बाबाजी मोरे (५६, ता. खेड) याच्याविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी नरेश मोरे हा गावात पोस्ट मास्तर म्हणून कार्यरत असून पीडित अल्पवयीन मुलगी त्याच्याकडे एप्रिल २०२५ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत आर.डी.चे लिखाण करण्यासाठी जात असताना लिखाण काम झाल्यानंतर तिच्यावर बळजबरी करून तिचे लैंगिक शोषण करीत असे.