

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरीतील आरोग्य मंदिर येथील परकार हॉस्पिटलच्या पहिल्या माळ्यावरील डायलिसीस वार्डातील वातानुकूलिन यंत्र शॉर्टसर्किटमुळे पेटले. सोमवारी सकाळी १०.३० वाजता लागलेली ही आग रत्नागिरी नगर परिषद आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या अग्नीशमन दलाने आटोक्यात आणली.
हॉस्पिटलमधील रूग्णांना जिल्हा रुग्णालयासह चिंतामणी हॉस्पिटल, लोटलीकर आणि डॉ. भोळे यांच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सुरक्षिततेसाठी परकार हॉस्पिटलच्या डायलिसीस वॉर्डमध्ये एका रुग्णाचे रक्त बदलले जात असतानाच सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वातानुकूलित यंत्राने पेट घेतला. यामध्ये डायलिसीस होत असलेल्या रुग्णांचा बेड काहीअंशी जळला.
आग मोठी नसली तरी संपूर्ण हॉस्पिटलमध्ये धुराचे लोट पसरले. हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग, बाहेर आला त्याचबरोबर रूग्णांना त्यांच्या आजारानुसार तज्ज्ञ रुग्णालयांमध्ये हलवले जावू लागले रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा रत्नागिरीतील आरोग्य मंदिर येथील परकार हॉस्पिटलच्या पहिल्या माळ्यावरील डायलिसीस वार्डातील वातानुकूलिन यंत्र शॉर्टसर्किटमुळे पेटले. सोमवारी सकाळी १०.३० वाजता लागलेली ही आग रत्नागिरी नगर परिषद आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या अग्नीशमन दलाने आटोक्यात आणली.
हॉस्पिटलमधील रूग्णांना जिल्हा रुग्णालयासह चिंतामणी हॉस्पिटल, लोटलीकर आणि डॉ. भोळे यांच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सुरक्षिततेसाठी परकार हॉस्पिटलच्या डायलिसीस वॉर्डमध्ये एका रुग्णाचे रक्त बदलले जात असतानाच सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वातानुकूलित यंत्राने पेट घेतला. यामध्ये डायलिसीस होत असलेल्या रुग्णांचा बेड काहीअंशी जळला.
आग मोठी नसली तरी संपूर्ण हॉस्पिटलमध्ये धुराचे लोट पसरले. हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग, बाहेर आला त्याचबरोबर रूग्णांना त्यांच्या आजारानुसार तज्ज्ञ रुग्णालयांमध्ये हलवले जावू लागले रुग्ण कोणत्या हॉस्पिटलमध्ये हलवला जात आहे. हे माहिती नसल्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये घबराट निर्माण झाली. रूग्णवाहिकांची ये-जा सुरू होती. त्यांना अडथळा येवू नये यासाठी वाहतूक पोलिस वाहतूकीचे नियंत्रण करीत होते. औद्योगिक विकास महामंडळ आणि रत्नागिरी नगर परिषदेचे अनिशमन दल हॉस्पीटलमध्ये दहा मिनीटाच्या आत पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू झाले.
काही मिनिटांतच आग विझली. औद्योगिक विकास महामंडळ आग्निशमन दलाचे उपआग्निशमन अधिकारी विवेक राणे, विमोचक दिलीप दळवी, प्रमोद राठोड, प्रवीण पवार, विनायक घोसावी, महेश मुरडी, चालक-यंत्र चालक विनायक सावंत तर नगर परिषदेच्या आग्शिमन दलाचे अधिकारी जितेंद्र विचारे, महेश साळवी, जवान संकेत कांबळे, संदीप शिवळकर, सुरज पवार, रोहन घोसाळे, मनिष साळवी यांनी ही आग वेळीच आटोक्यात आणली.
हॉस्पिटलमधील रूग्णांपैकी आठ रूग्ण जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. सात रूग्ण चिंतामणी हॉस्पिटलमध्ये, दोन रूग्ण लोटरीकर हॉस्पिटल, एक रूग्ण डॉ. भोळे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला. आग लागली त्या पहिल्या माळ्यावरील अतिदक्षता विभागातील रूग्णांना तातडीने या दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे.
हॉस्पिटलमधील अग्निरोधक यंत्र अपयशी...
परकार हॉस्पिटलमधील दोन अग्निरोधक यंत्राद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. पंरतु वातानुकुलिन यंत्राला लागलेली आग आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषद आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले.