Ratnagiri news | पाण्यात बुडणाऱ्या वृद्ध महिलेसाठी युवक ठरला देवदूत!

खेड शहरात बचावकार्याचा थरार; शिवम शिबे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
Ratnagiri news | पाण्यात बुडणाऱ्या वृद्ध महिलेसाठी युवक ठरला देवदूत!
Published on
Updated on

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातून खारी गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील पुलाखाली मंगळवार दि. २६ रोजी एक थरारक घटना घडली. एका वृद्ध महिलेचा पाण्यात बुडून जीव जाण्याची वेळ आली असताना स्थानिक युवक शिवम शिबे यांनी प्रसंगावधान राखत धाडसी बचावकार्य करून तिचा जीव वाचवला.

Ratnagiri news | पाण्यात बुडणाऱ्या वृद्ध महिलेसाठी युवक ठरला देवदूत!
Daund DJ Clash: राहूत डीजेच्या आवाजावरून रणकंदन; महिलांनी दाखवले धाडस

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिला पुलाखालील पाण्यात बुडत असल्याचे शिवम शिबे यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी क्षणाचाही विलंब न करता खोल नदीपात्रात उडी घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी महिलेपर्यंत पोहोचून तिला सुरक्षित बाहेर काढले.

Ratnagiri news | पाण्यात बुडणाऱ्या वृद्ध महिलेसाठी युवक ठरला देवदूत!
Chhatrapati Sambhajinagar drowning Accident : शेततळ्यातील पाणी पाहण्याचा मोह बेतला जीवावर

या धाडसी आणि मानवतावादी कृतीमुळे परिसरात एकच कौतुकाची लाट उसळली असून “देवदूत बनून आला तरुण” अशा शब्दांत नागरिकांकडून शिवम शिबे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान, शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे खेड शहर शाखेमध्ये शिवम शिबे यांचा तत्काळ सत्कार करण्यात आला. त्यांच्या धाडसाचे आणि सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news