Ratnagiri Municipal Election| जिल्ह्यात सरासरी 70 टक्के मतदान

रत्नागिरी जिल्ह्यात चार नगर परिषदांसह तीन नगर पंचायतींसाठी मतदान शांततेत
Ratnagiri municipal election 2025 voting
रत्नागिरी : नगर नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान केंद्राबाहेर मतदारांची लागलेली रांग.Pudhari Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी मतदान पार पडले. जिल्ह्यात काही शहरांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला तर रत्नागिरीत दुपारी साडेतीन पर्यंत मतदारांमध्ये निरुत्साह दिसत होता. सर्वाधिक कमी मतदान रत्नागिरी नगर पालिकेसाठी झाले आहे. तर सर्वाधिक मतदान हे गुहागर, लांजा, देवरुख व राजापूरमध्ये झाले आहे. जिल्ह्यात सातही ठिकाणी निवडणुका शांततेत पार पडल्या. जिल्ह्यात सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत सुमारे 70 टक्क्यांहून अधिक मतदान पार पडले होते.

रत्नागिरी जिल्ह्यात सात शहरांमध्ये नगर पालिका व नगर पंचायतीच्या निवडणुका रंगल्या. यामध्ये नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये नागरिकांचा मोठा उत्साह दिसून आला तर नगर पालिकेच्या निवडणुकीत रत्नागिरी व खेडमध्ये अपेक्षित मतदान झाले नाही. जिल्ह्यात रत्नागिरीत मतदान यंत्र बंद पडल्याच्या घटना घडल्या. मात्र ही यंत्रे बदलण्यात यश आले.

मंगळवारी सकाळी 7.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत 83 हजार 283 मतदान झाले. एकूण 200 मतदान केंद्रावर 1 लाख 60 हजार 457 मतदारांपैकी 83 हजार 283 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष 40 हजार 907, महिला 42 हजार 374 तर इतर 1 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींसाठी मंगळवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात 14.26 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. पहिल्या दोन तासात गुहागर नगर पंचायतीसाठी 24.37 टक्के मतदान झाले. यामध्ये 826 पुरुष आणि 567 स्त्री अशा एकूण 1 हजार 394 मतदारांनी मतदान केले. रत्नागिरी नगर परिषदेकरिता 10.05 टक्के मतदान झाले.

यामध्ये 3 हजार 793 पुरुष, 2 हजार 712 स्त्री असे एकूण 6 हजार 504 मतदान नोंदवण्यात आले. चिपळूणमध्ये 10.38 टक्के मतदान झाले. या 2 हजार 543 पुरुष तर 1 हजार 877 स्त्री असे एकूण 4 हजार 420 मतदान नोंदवण्यात आले. खेडमध्ये 11. 91 टक्के मतदान नोंदवण्यात आले. यामध्ये 938 पुरुष, 729 स्त्री असे एकूण 1 हजार 667 मतदान नोंदवण्यात आले. राजापूर नगर परिषदेत 14.25 टक्के मतदान झाले.

यात 713 पुरुष, 447 स्त्री असे एकूण 1 हजार 160 मतदान नोंदवण्यात आले. लांजा मध्ये 13.96 टक्के मतदान झाले. यामध्ये 1211 पुरुष तर 776 स्त्री असे एकूण 1 हजार 987 मतदारांनी मतदान केले. देवरुखमध्ये 15.92 टक्के मतदान झाले. यात 1 हजार 5 पुरुष तर 713 स्त्री असे 1 हजार 718 मतदारांनी मतदान केले होते. पहिल्या दोन तासात 11 हजार 28 पुरुष तर 7 हजार 721 स्त्री अशा 18 हजार 849 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी साडेनऊ नंतर सातही ठिकाणी मतदानाची आकडेवारी वाढल्याचे दिसून आले. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत जिल्ह्यात 30.89 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. यात 22 हजार 134 पुरुष मतदार तर 19 हजार 641 स्त्री मतदार अशा एकूण 41 हजार 776 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत रत्नागिरीत 21.93 टक्के, चिपळूण 24.02 टक्के, खेड 28.01 टक्के, राजापूर 30.28 टक्के, लांजा 32.06 टक्के, देवरुख 32.86 टक्के आणि गुहागर नगर पंचायतीमध्ये सर्वाधिक 46.47 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. दुपारी दीड वाजेपर्यंत मतदारांचा उत्साह कायम होता. 11.30 ते 1.30 या दोन तासात जिल्ह्यात 46.64 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.

यात 64 हजार 852 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दीड वाजेपर्यंत रत्नागिरीत 34.25 टक्के, चिपळूण 39.02 टक्के, खेड 41.34 टक्के, राजापूर 49.74 टक्के, लांजा 49.11 टक्के, देवरुख 51.77 टक्के आणि गुहागर मध्ये 61.28 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली होती. सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात 58.31 टक्के मतदान झाले.

साडेतीन वाजेपर्यंत 83 हजार 283 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 40 हजार 907 पुरुष तर 42 हजार 375 स्त्री मतदारांनी मतदान केले. रत्नागिरीत साडेतीन वाजेपर्यंत 44.82 टक्के, चिपळूण 51.26 टक्के, खेड 52.05 टक्के, राजापूर 64.34 टक्के, लांजा 61.57 टक्के, देवरुख 64.55 टक्के आणि गुहागर मध्ये 69.12 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली होती.

Ratnagiri municipal election 2025 voting
Ratnagiri Parshuram Ghat Accident | परशुराम घाटात मासेवाहू ट्रक उलटला

मतदान संपण्याच्या वेळी साडेपाच वाजता गुहागरमध्ये 75.26 टक्के इतके मतदान झाले असून पुरुष 2244 तर महिला 2242 असे 4486 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. रत्नागिरीत सरासरी 56 टक्के मतदान झाले. चिपळूणमध्ये सुमारे 65 टक्के, लांजात 71.4 टक्के, राजापूर 74.55, देवरुख सुमारे 72 टक्के तर खेडमध्ये सुमारे 60 टक्के मतदान झाले आहे.

Ratnagiri municipal election 2025 voting
Ratnagiri Municipal Voting | जिल्ह्यात आज चार नगर परिषदा, तीन नगर पंचायतींसाठी मतदान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news