Summer Special ST Bus | उन्हाळी वाहतुकीसाठी रत्नागिरी विभागात 70 टक्के बुकिंग फुल्ल..!

Summer Special ST Bus | रत्नागिरी विभागातर्फे उन्हाळी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. १ हजारहून अधिक जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
ST Bus
ST BusPudhari
Published on
Updated on

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी विभागातर्फे उन्हाळी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. १ हजारहून अधिक जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. नऊ आगारातून दररोज ३० बसेस विविध मार्गावर धावत आहेत. आतापर्यंत ७० टक्के ऑनलाईन बुकिंग झाली असून मे मध्ये शंभर टक्के बुकिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनो आताच एसटी बसचे बुकिंग करा, असे आवाहन एसटी विभागाने केले आहे.

ST Bus
Goa Heatwave Yellow Alert| गोव्याची लाही-लाही! 22 एप्रिलपर्यंत उकाडा कायम राहणार; हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज

काही शाळा-महाविद्यालयात परीक्षा सुरू आहे तर काहींचे परीक्षा संपलेल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्या सुट्टीत मूळ गावी जाण्यासाठी, पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडू लागले आहेत. उन्हाळ्यात वाढती गर्दी लक्षात घेता रत्नागिरी विभागाच्या वतीने १ हजार जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

१५ एप्रीलपासून नऊ आगारातून १० बसेस पश्चिम महाराष्ट्रासह, मुंबई, मराठवाडा, विदर्भ याभागात बसेस धावत आहेत. दरवर्षाप्रमाणे यंदाही प्रवाशांनी प्रवासासाठी लालपरीला पसंती दिली असून ७० टक्केहून अधिक प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट बुकिंग केले आहे. येत्या २५, २६ एप्रिलपासून एसटी बसेसना आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनो आतापासून ऑनलाईन तिकीट काढा असे आवाहन एसटीने केले आहे.

ST Bus
Nashik Dangerous Buildings Notice | नाशिकमध्ये 1,181 धोकादायक वाड्यांना मनपाचा अल्टिमेटम

'या' मार्गावर धावतायेत बसेस

रत्नागिरीसह ८ आगारांतून मुंबई-पुणेसह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, मिरज, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, अकोला, नंदुरबार, परभणी, बुलडाणा यासह विविध मार्गावर बसेस धावत आहेत.

रत्नागिरी विभागातून उन्हाळी वाहतूक सुरू झालेली आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ हजारहून अधिक जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट काढून आपली जागा निश्चित करावी. जादा वाहतूक १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत असणार आहे.

- आश्वजीत जानराव, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news