Ratnagiri News : मासळीच्‍या सेसमुळे बाजार समितीच्‍या उत्‍पन्नात वाढ

वर्षभरात बाजार समितीला २३ लाख ४९ हजारांचा नफा
fish market news
fish market news
Published on: 
Updated on: 

रत्‍नागिरी : जिल्‍हा कृषी ‍ बाजार समितीच्‍या माध्‍यमातून विविध विकासकामे, उत्‍पन्नवाढीचे नवे स्‍त्रोत आणि शेतकरी-व्‍यापाऱ्यांसाठी विविध कल्‍याणकारी योजनांमुळे जिल्‍हा कृषी ‍ बाजार समितीच्‍या उत्‍पन्नात मोठी वाढ झाली आहे. मच्‍छी व्‍यापाऱ्यांना परवाना बंधनकारक केल्‍याने सर्वाधिक फायदा बाजार समितीला झाला असून महसुलात मोठी वाढ झाली आहे. सन २०२५-२६मध्‍ये बाजार समितीचे एकूण ‍ १ कोटी ४९ लाख २२ हजार ५४१ एवढे मिळाले असून २३ लाख ४९ हजार ७६ रुपयांचा निव्‍वळ नफा झाल्‍याची माहिती सभापती संदीप सुर्वे यांनी दिली.

राज्‍याचे मत्‍स्‍य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मत्‍स्‍य व्‍यवसायाला कृषी दर्जा मिळवून दिला, त्‍याचा फायदा कृषी ‍ बाजार समितीला झाला आहे. बाजार समितीने त्‍यासाठी मंत्री राणे व मत्‍स्‍य व्‍यवयसाय विभागाकडे पाठपुरावा करुन मच्‍छी व्‍यापाऱ्यांना बाजार समितीचा परवाना घेणे, मार्केट सेस व परवाना नुतनीकरण करणे बंधनकारक केले. त्‍यामुळे मोठ्या संख्‍येने मच्‍छी व्‍यापाऱ्यांनी परवाने धारण केल्‍यामुळे बाजार समितीच्‍या उत्‍पन्नात मोठी वाढ झाली आहे.

लांजा तालुक्‍यातील देवधे येथे स्‍वमालकीच्‍या जागेमध्‍ये आंबा काजू उत्‍पादक, प्रक्रिया व व्‍यापाऱ्यांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्‍यासाठी शासनाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मिळण्‍यासाठी प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला आहे. त्‍याचप्रमाणे बाजार समितीच्‍या नाचणे येथील आवारात व्‍यापारी लिलाव गाळे, गोदाम व सौरउर्जा प्रकल्‍पासाठी पालकमंत्री व सिंधुरत्‍नचे रत्‍नागिरी अध्‍यक्ष उदय सामंत यांच्‍याकडे दोन कोटीचा प्रस्‍ताव असून शंभर टक्के अनुदानासाठी पाठपुरावा सुरु आहे.

बाजार समितीमध्‍ये मागील तीन वर्षापासून बंद असलेली काजू बी शेतमाल तारण योजनेसाठी राज्‍य कृषी पणन मंडळाकडून पाच लाख रुपये कर्ज ‍ करुन व स्‍वनिधीचा वापर करुन पुन्‍हा सुरु करण्‍यात आली आहे. या योजनेंतर्गत पाच काजू बी उत्‍पादकांना सुमारे २२ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्‍यात आले आहे.

गुहागर तालुक्‍यातील चिखली येथे जनावरांचा उपबाजार सुरु करण्‍यात आला आहे तर चिपळूण उक्ताड येथील नगर पालिकेच्‍या हद्दीतील १९२ गुंठे आरक्षित भूखंड विनामूल्‍य वर्ग करण्‍यासाठी जिल्‍हाधिकाऱ्यांकडे प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला असून यासंदर्भात मुख्‍यमंत्री व पणन मंत्र्‍यांची भेट घेतली जाणार असल्‍याचेही संदीप सुर्वे यांनी सांगितले.

नियमित सेस भरणाऱ्या रत्‍नागिरी तालुक्‍यातील पाच काजू बी व्‍यापाऱ्यांना २०० किलो क्षमतेचे वजनकाटे वाटप करण्‍यात आले आहेत. यानंतर लांजा-राजापूर तालुक्‍यातील व्‍यापाऱ्यांना वजनकाटे वाटप केले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news