Ratnagiri Lote MIDC Water Crisis | लोटे एमआयडीसीवर पाणीबाणी; ४८ तासांत उद्योग ठप्प होण्याची भीती

२० हजार कामगारांच्या रोजगारावर संकट; १९ गावांतही पाणीटंचाई
खेड : लोटे औद्योगिक वसाहतीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राज आंबे. (छायाः अनुज जोशी)
खेड : लोटे औद्योगिक वसाहतीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राज आंबे. (छायाः अनुज जोशी)
Published on
Updated on

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या लोटे एमआयडीसीवर भीषण पाणीटंचाईचे संकट कोसळले असून, पुढील ४८ तासांत अनेक उद्योग बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा करण्यास असमर्थता दर्शविल्याने औद्योगिक विकास महामंडळाकडून हात टेकले गेले आहेत. परिणामी, सुमारे २० हजार कामगारांच्या रोजगारासह परिसरातील १९ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

खेड : लोटे औद्योगिक वसाहतीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राज आंबे. (छायाः अनुज जोशी)
Ratnagiri Extortion Case: बदनामीची धमकी देत 17 लाखांची खंडणी उकळली

लोटे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज आंब्रे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत हा गंभीर प्रश्न मांडला. वाढत्या पाणीटंचाईमुळे अनेक उद्योगांचे उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर असून काही कंपन्यांनी उत्पादनात मोठी कपात करण्यास सुरुवात केली आहे. घरडा कंपनीने तर तब्बल ८० टक्के उत्पादन बंद करून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

उद्योजकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांची भेट घेऊन तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. नजीकच्या धरणातून टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असले तरी उद्योगांसाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. कोयना धरणाच्या अवजलावर अवलंबून असलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीसाठी कायमस्वरूपी पर्याय उभारण्यात झालेल्या विलंबामुळे आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे

खेड : लोटे औद्योगिक वसाहतीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राज आंबे. (छायाः अनुज जोशी)
Ganpatipule tourists drowned | गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले, शोधकार्य सुरू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news