Ratnagiri News : भारतीय नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

Indian Navy fishing ban: दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
Indian Navy restricted fishing area
Ratnagiri News : भारतीय नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीरpudhari photo
Published on
Updated on

रत्नागिरी : भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर नौदल विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाची ७ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये भारतीय नौदल विभागाकडून खालील नमूद ठिकाणी ऑफशोअर डिफेन्स एरिया (Offshore Defence Area ODA) मासेमारी प्रतिबंध क्षेत्र (No Fishing Zone) घोषित करण्यात आले आहे. नौदल विभागाने आखून दिलेल्या उपरोक्त परिसरामध्ये कोणतीही नौका आढळून आल्यास "दिसताच क्षणी गोळ्या घालणे (शूट टु किल)" चे आदेश नौदल विभागास देण्यात आलेले आहेत.

MH/BASSEIN 18°31'45"N, 072°09'40″E. 18°32′04″N, 071°09'08″E. 19°46′49″N, 072°11'27″E. 19°46′42″N, 072°11'36″E. NEELAM 18°49'11"N, 072°10'00″E. 18°49'23"N, 072°25'01″E. 18°09'59"N, 072°25'13″E. 18°10'12"N, 072°10'00″E. वरील ठिकाणी कोणतीही मासेमारी नौका मासेमारीस वा अन्य कोणत्याही प्रयोजनास जाणार नाही तसेच नौदल विभागाने आखून दिलेल्या उपरोक्त परिसरामध्ये कोणतीही नौका आढळून आल्यास "दिसताच क्षणी गोळया घालणे (शूट टु किल)" चे आदेश नौदल विभागास देण्यात आलेले आहेत.

Indian Navy restricted fishing area
India Pakistan Tension | गरज पडल्यास आपातकालीन अधिकार लागू करा; केंद्रीय गृह मंत्रालयाचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना पत्र

तरी या ठिकाणी आपले अधिनस्त कोणतीही मासेमारी नौका जाणार नाही याबाबतची दक्षता सर्व नौका मालक व मच्छिमार यांनी घ्यावी. मच्छिमार नौकांच्या सर्वेक्षणाकरीता नौदल विभागाकडून संस्थानिहाय नौकांची माहिती मागविण्यात आली असल्याने ही माहिती परवाना अधिकारी यांच्यामार्फत तात्काळ सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय या कार्यालयास सादर करावी, असे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सा.वि.कुवेसकर यांनी कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news