Ratnagiri Crime | रत्नागिरीत ‘फ्लोटिंग गोल्ड’ची तस्करी उधळली; २.५ कोटींच्या अंबरग्रीससह एकजण अटकेत

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुप्त माहितीच्या आधारे रचला होता सापळा
Ratnagiri Crime
अंबरग्रीसच्या तस्‍करीप्रकरणी रत्‍नागिरी पोलिसांनी अटक केलेला आरोपीPudhari Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : शहराजवळील एमआयडीसी परिसरात व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी आणणाऱ्या एका संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. या कारवाईत २.५ किलो वजनाची, अंदाजे २ कोटी ५० लाख रुपये किंमतीची अंबरग्रीस आणि ५० हजारांची दुचाकी असा एकूण २ कोटी ५० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी रात्री १०.४५ वाजता करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव एजाज अहमद युसूफ मिरकर (वय ४१, मूळ रा. पिंगी मोहल्ला मिरकरवाडा, सध्या रा. कदमवाडी, कोकणनगर, रत्नागिरी) असे आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पथकाने एमआयडीसी परिसरात सापळा रचला होता. रात्री १०.४५ वाजता एजाज मिरकर हा विना परवाना व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन येताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी चौकशी केली असता, त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Ratnagiri Crime
सिंधुदुर्ग : दांडी, चिवला बीचवर सापडलेले ‘ते’ अंबरग्रीस नसून पॉली ऍनाईल क्लोराईड पदार्थ

या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ, गणेश सावंत आणि चालक पोलिस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.

Ratnagiri Crime
Ratnagiri Crime News | हरियाणातील तरुणीने रत्नागिरीतील समुद्रात उडी घेत जीवन संपविले, प्रियकराविरोधात गुन्हा दाखल

‘फ्लोटिंग गोल्ड’ म्हणजे काय?

व्हेल माशाची उलटी, म्हणजेच अंबरग्रीस, ‘फ्लोटिंग गोल्ड’ या नावानेही ओळखली जाते. हे पदार्थ व्हेलच्या जठरामधून उलटीद्वारे बाहेर पडून समुद्रकिनाऱ्यावर येतात. अंबरग्रीसचा वापर महागड्या अत्तरांच्या निर्मितीसाठी केला जातो, ज्यामुळे अत्तराचा सुगंध दीर्घकाळ टिकतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला मोठी मागणी असून, त्याची किंमत कोटींमध्ये असल्याने तस्करीचे प्रमाणही वाढले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news