Ratnagiri Crime News | हरियाणातील तरुणीने रत्नागिरीतील समुद्रात उडी घेत जीवन संपविले, प्रियकराविरोधात गुन्हा दाखल

दुसऱ्या मुलीसोबत प्रियकराने रिलेशनशिप सुरु केल्याने तरुणीला मानसिक धक्का
  Crime News
प्रातिनिधिक छायाचित्र(File Photo)
Published on
Updated on

Haryana girl dies Ratnagiri

रत्नागिरी : रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील पान भुयार स्पॉटजवळ समुद्रात उडी घेत सुखप्रित धाडिवाल (वय 25, सध्या रा. पिंपळगाव नाशिक, मुळ रा. एलनाबाद ,जि. सिरसा, हरियाणा) या तरुणीने आपले जीवन संपविले. या प्रकरणी संशयित प्रियकराविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जसस्मिक केहर सिंग (वय 29, सध्या रा.सिध्दीविनायक नगर, शिवाजीनगर, रत्नागिरी, मूळ रा. भाटिया कॉलनी फतेहाबाद, हरियाणा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित प्रियकराचे नाव आहे.

बेपत्ता तरुणीचे वडील प्रकाशसिंग हरनेकसिंग धाडियाल (वय 69, रा.एलनाबाद, जि. सिरसा, हरियाणा) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आपली मुलगी सुखप्रित नाशिकमधून बेपत्ता झाल्याप्रकरणी त्यांनी तेथील पिंपळगाव पोलिस ठाण्यात खबर दिली होती. ती बेपत्ता प्रकरणाच्या चौकशी दरम्यान सुखप्रित ही रत्नागिरी येथे आली असल्याचे त्यांना समजले. तेव्हा ते रत्नागिरी येथे गुरुवारी आले होते. त्यावेळी त्यांना रत्नागिरी पोलिसांनी घटनास्थळी मिळून आलेले चप्पल आणि ओढणी दाखवली. त्या वस्तू आपल्या मुलीच्याच असल्याचे त्यांनी ओळखले.

  Crime News
Ratnagiri ZP News | इस्रो-नासा दौरा विद्यार्थी की अधिकार्‍यांसाठी?; पालकमंत्र्यांनी रत्नागिरी जि.प.मधील अधिकार्‍यांची घेतली ’शाळा‘

आपल्या मुलीच्या घातपातास तिचा प्रियकरच जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केला. त्यांची मुलगी सुखप्रित हिचा मित्र जस्मिक केहर सिंग याने तिच्याशी मैत्री करून तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तिच्याशी असलेले नाते तोडून दुस-या मुलीसोबत रिलेशनशिप सुरु केले होते. त्याने तिला वेळोवेळी टाळून तिचा मानकिस छळ केला होता. ती रविवारी (दि. 29 जून) जस्मिकला भेटण्यासाठी रत्नागिरी येथे आलेली असताना त्याने तिला न भेटताच तू परत नाशिकला जा असे सांगितले.

त्यामुळे तिला मानसिक त्रास देवून फिर्यादी यांची मलगी सुखप्रित धाडीवाल हिला शिवसृष्टी भगवती किल्ला रत्नागिरी येथून समुद्राच्या पाण्यात उडी मारुन जीव देण्यासाठी प्रवृत्त केले, असे त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.

सुखप्रितचे नातेवाईक गावी रवाना

समुद्रात बेपत्ता झालेल्या सुखप्रितचे वडिल प्रकाशसिंग धाडियाल व तिचे भाऊ गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शुक्रवारी आपल्या गावी रवाना झाले. दरम्यान, पोलिस यंत्रणा सुखप्रितचा समुद्रकिनार्‍यांवर गस्त आणि ड्रोनच्या सहाय्याने शोध घेत असून तिचा शोध लागताच तिच्या पालकांशी पुन्हा संपर्क करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  Crime News
Ratnagiri : रत्नागिरी मिरकरवाडा बंदराच्या विकासकामांसाठी 26 कोटींचा निधी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news