Ratnagiri Fishermen Crisis: रत्नागिरीतील मच्छीमारांनी 'मत्स्य दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी का केली?

Ratnagiri Fishermen Crisis | मच्छीमार खलाशी संघटनेचे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांना निवेदन
representative image
Fisherman (representative image)Pudhari
Published on
Updated on

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

मच्छीमारांचे उत्पन्न चालू मासेमारी मोसमात फारच कमी झाले आहे. त्यामुळे मच्छीमार कुटुंबांवर आर्थिक संकट आले आहे. अशावेळी जिल्ह्यात मच्छीमार दुष्काळ जाहीर करून मच्छीमारांना विशेष आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी रत्नागिरी मच्छीमार खलाशी आणि कामगार कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष समीर वस्ता यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

representative image
Ratnagiri Sea Turtle Conservation | कासवांच्या प्रजननासाठी आता वन विभागाचा 'वॉच'; रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांवरील बांधकामांना चाप!

मच्छीमारांचा गेल्या अनेक वर्षातील यंदाचा मासेमारी मोसम फारच तोट्याचा झाला. समुद्रात खचपिक्षा फारच कमी मासळी मिळाली. हवामानातील बदलामुळे माशांचे स्थलांतरण झाल्याने नौकांना मासळीच मिळेनाशी झाली.

त्यात वाढलेल्या डिझेलदरासह नौकेतील खलाशांचा खर्चही अंगावर पडला. त्यामुळे नौका मालक व मच्छीमार कुटुंबाची आर्थिक स्थिती बिघडून गेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ही एकप्रकारे मच्छीमार समाजावर पडलेली दुष्काळी परिस्थिती आहे, असे समीर वस्ता यांच्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

representative image
Gudi Padwa Yatra Traffic Changes | सातपूरकरांनो लक्ष द्या! गुढीपाडवा यात्रेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गावर नो-एन्ट्री

आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छीमारांना तातडीने शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी विनंती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांना करण्यात आली आहे. मच्छीमारांना विशेष आर्थिक मदत जाहीर करावी. त्याचबरोबर डिझेल अनुदान किंवा विशेष सवलत देण्यात यावी.

मच्छीमारांसाठी कल्याणकारी योजना राबवून अनुदान दिले जावे. मासेमारी उद्योग टिकवण्यासाठी मत्स्यव्यवसायसाठी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यास आणि व्याजदरावर सवलत दिली जावी, अशा मागण्याही मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news