Ratnagiri Accident : भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

आरवली ते माखजन मार्गावरील घटना
Accident
AccidentFile Photo
Published on
Updated on

देवरुख : आरवली ते माखजन मार्गावरील करजुवे आंतरजिल्हा रस्त्यावर सरंद-बुरंबाड सीमेजवळ एक भीषण रस्ता अपघात घडला असून, यामध्ये एका २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:१५ वाजण्याच्या सुमारास तुषार शंकर मुक्षे (वय २२, रा. मुक्षेवाडी, बुरंबाड, ता. संगमेश्वर) हा तरुण आपल्या ताब्यातील एफ.झेड. मोटारसायकलने (एमएच ०८ एटी ५७७९) आरवली ते माखजन मार्गाने जात होता. बुरंबाड व सरंदच्या सीमेवर आले असता, वाहनावरील ताबा सुटल्याने मोटारसायकल रस्त्यावर भीषणपणे स्लिप झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये तुषारला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news