Ratnagiri drought relief fund allocation|दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी महायुती सरकार खंबीर

पालकमंत्री डॉ. उदय सामत : रत्नागिरीसाठी १५.६२ कोटींचा निधी मिळणार
Ratnagiri drought relief fund allocation
Ratnagiri drought relief fund allocation
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना आणि हे वर्ष संकटाचे ठरले असताना बळीराजाच्या घरातही सर्वांप्रमाणे आनंदात दिवाळी साजरी व्हावी, हीच महायुती सरकारची भूमिका आहे. याच भावनेतून राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रथम मदत म्हणून प्रती शेतकरी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. २२ हजार ४९४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे ११ कोटी २५ लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत, असे सांगतानाच पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्यातील तमाम जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

येणारे पुढील वर्ष आपल्या सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावो, अशी प्रार्थना ईश्वरचरणी करतो, अशा शब्दात दिवाळी शुभेच्छा देवून पालकमंत्री डॉ. सामंत पुढे म्हणाले, हे वर्ष अत्यंत संकटाचे वर्ष ठरले असून संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. या दुष्काळात रत्नागिरी जिल्ह्यातील ३१ हजार २४८ शेतकरी बाधित झाले आहेत.

५ हजार रुपयांची प्राथमिक मदतदुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची दिवाळीदेखील आमच्याप्रमाणेच साजरी झाली पाहिजे, हा महायुती सरकारचा संवेदनशील दृष्टिकोन असल्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासनाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना प्रथम मदत म्हणून ५ हजार रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे सामंत यांनी सांगितले.

२२ हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यात ११.२५ कोटी जमा

जिल्ह्यातील मदतीची सविस्तर आकडेवारी मांडताना डॉ. उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील ३१ हजार २४८ शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होणार आहे. यासाठी जिल्ह्यासाठी एकूण १५ कोटी ६२ लाख ४० हजार रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. यापैकी २२ हजार ४९४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे ११ कोटी २५ लाख रुपये आधीच थेट जमा करण्यात आले आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे उर्वरित ज्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे जमा झालेले नाहीत, त्यांचे पैसे तातडीने जमा करावेत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री म्हणून प्रशासनाला देण्यात आले आहेत.

पूर्ण नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश

सध्या दिलेली ५ हजार रुपयांची मदत ही प्राथमिक स्वरूपाची आहे, असे स्पष्ट करत त्यांनी पुढे सांगितले, शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात महाराष्ट्र शासन १०० टक्के सहभागी आहे. प्राथमिक मदत दिली असली तरी पूर्ण नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री या नात्याने मी रत्नागिरी जिल्ह्यात दिले आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा वहिनी यांनी संपूर्ण राज्यभरात असे आदेश दिले आहेत.

महायुतीचे शासन शेतकऱ्यांच्या सोबत

शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. महायुतीचे हे महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या सोबत १०० टक्के खंबीरपणे उभे आहे, ही ग्वाही मी या दिवाळीच्या निमित्ताने कोकणातील आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना देतो, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला. शेवटी त्यांनी पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Ratnagiri drought relief fund allocation
Chiplun flyover opening new year |नववर्षाच्या स्वागताला चिपळूणचा उड्डाण पूल खुला होणार

शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष साजरी करणार दिवाळी

पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले, संकटाच्या पहिल्या दिवसापासूनच जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे योग्य पंचनामे व्हावेत आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहोत आणि यातच आम्हाला सर्वांना समाधान आहे. आमच्याकडे दिवाळी साजरी होत असताना या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरामध्येही ती साजरी झाली पाहिजे. यासाठी मी स्वतः ज्या ठिकाणी अतिशय मोठा दुष्काळ पडलेला आहे, त्या भागात जाऊन शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी करणार असून त्यांच्यासोबत फराळाचा कार्यक्रमही आयोजित केल्याचे सामंत म्हणाले.

Ratnagiri drought relief fund allocation
Chiplun Accident : पिंपळी बुद्रुक येथे दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.