Ratnagiri Water Crisis | रत्नागिरी पाणीटंचाईतून मुक्त होणार!

ग्रॅव्हीटीने पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाचे काम पूर्ण; पाईपलाईनचे काम सुरू; १६ कोटी खर्च
Ratnagiri Water Crisis
रत्नागिरी : पानवल धरणाचे पूर्ण झालेले काम.
Published on
Updated on

रत्नागिरी : शहराला ग्रॅव्हीटीने (गुरुत्वाकर्षण) पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या पुनर्बाधणीचे काम पूर्ण झाले असून, किरकोळ कामे सुरू आहेत. या धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणारी पाईपलाईन धरणाजवळ जोडण्याचे काम सुरू असून पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने धरण भरणार असल्याने शीळ धरणावरील ताण कमी होणार आहे.

रत्नागिरी शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि नगरपालिकेच्या मालकीच्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम दीर्घकाळ प्रलंबित राहिले होते. आता ते काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. शासनाकडून मंजूर झालेल्या १६ कोटी रुपयांच्या भरीव निधीतून या धरणाच्या नूतनीकरणाचा टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. आता केवळ पाणीपुरवठ्याची पाईपलाईन जोडणे आणि धरणातील गाळ काढण्याचे काम शिल्लक राहिले आहे.

Ratnagiri Water Crisis
Khed Government Rest House Project | खेडमधील शासकीय विश्रामगृह बंद

ही उर्वरित कामे येत्या काही दिवसांत संपणार असून यामुळे रत्नागिरीकरांना दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटातून कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पानवल धरणाच्या मुख्य भिंतीला तडे गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत होती, यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा राहत नसे आणि लाखो लिटर पाणी वाया जात होते. शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणारा हा गंभीर परिणाम लक्षात घेऊन प्रशासनाने याच्या दुरुस्तीचा आराखडा तयार केला होता.

१६ कोटी रुपयांच्या या विशेष प्रकल्पात घरणाच्या भिंतीचे ग्राउटिंग करून गळती रोखणे आणि सांडव्याची दुरुस्ती करणे अशा तांत्रिक कामांना प्राधान्य देण्यात आले. जलसंपदा विभागाने हे आव्हान पेलत धरणाचे मुख्य काम पूर्ण केले आहे. सध्या धरणाची मुख्य भिंत नव्याने बांधून सुरक्षित करण्यात आली असून स्थापत्य विभागाचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ धरणातील साठलेला गाळ उपसणे आणि मुख्य पाणीपुरवठा वाहिनी जोडण्याचे तांत्रिक काम प्रगतिपथावर आहे. ही कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या दुरुस्तीमुळे यंदाच्या पावसाळ्यात हे धरण आपल्या पूर्ण क्षमतेने भरले जाणार आहे. याचा सर्वाधिक फायदा रत्नागिरी शहरातील उंचावरील व सखल भागांना होणार आहे.

Ratnagiri Water Crisis
Chiplun Highway Tree Plantation Protest | महामार्गालगत झाडे लावण्याबाबत शहा ठाम

पाणी वितरणावरील खर्च कमी होणार पानवल धरणातून पाणी ग्रॅव्हीटीने शहरात येत असल्याने याचा पाणी वितरणासाठी येणारा खर्चही कमी आहे. या सध्या पाईपलाईनचे काम सुरू असून नगरपालिकेचा ते लवकर पूर्ण करण्यावर भर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news