Khed Government Rest House Project | खेडमधील शासकीय विश्रामगृह बंद

Khed Government Rest House Project | खेडमधील शासकीय विश्रामगृह बंद
Khed Government Rest House Project
Khed Government Rest House Project
Published on
Updated on

खेड शहर : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खेड येथे उभारण्यात आलेले शासकीय विश्रामगृह सध्या बंद अवस्थेत असल्याची स्थिती आहे. तब्बल २ कोटी ८० लाख रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम अद्याप पूर्णत्वास गेले नसून, आवश्यक निधी उपलब्ध न झाल्यामुळे उर्वरित काम रखडले आहे.

सध्या या विश्रामगृहाच्या तळमजल्यावरील चार सूट्सचे काम पूर्ण झाले असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांसाठी सेवा सुरू करण्यात आलेली नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे केअरटेकर, चौकीदार आणि खानसामा ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. कर्मचारी नसल्यामुळे विश्रामगृहाचे व्यवस्थापन करणे शक्य नसून त्यामुळेच ऑनलाईन बुकिंग सेवा देखील अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, शासनाने मोठा खर्च करून उभारलेली ही वास्तू वापराविना पडून आहे. स्थानिक नागरिक व प्रवाशांमध्ये याबाबत नाराजी व्यक्त होत आहे, हंगामी तत्वावर कर्मचारी उपलब्ध करून देत विश्रामगृह तातडीने सुरू करावे, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

Khed Government Rest House Project
Ratnagiri bhatye beach | भाट्ये किनाऱ्यावरुन कासवाच्या पिल्लांनी घेतली समुद्रात झेप

दरम्यान, संबंधित विभागाने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून उर्वरित काम पूर्ण करावे व आवश्यक कर्मचारी नियुक्त करून विश्रामगृह सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

Khed Government Rest House Project
Ratnagiri Water Crisis |जिल्ह्यात २६ हजार ४८५ लोकांचा घसा कोरडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news