Ratnagiri News | देवरुखमधील सप्तलिंगी नदीत बुडणाऱ्या दोघांना वाचवले, गणपती विसर्जनावेळी टळला अनर्थ

Ratnagiri News | देवरुखमधील सप्तलिंगी नदीत बुडणाऱ्या दोघांना वाचवले धाडसाने, गणपती विसर्जनावेळी टळला अनर्थ
Drowning incident
Drowning incident in devrukh city file photo
Published on
Updated on

Devrukh Saptalingi river two youth life saved

देवरुख : शहरातील सप्तलिंगी नदीपात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना बुडत असताना वाचवण्यात आले. तरुणाच्या सहकाऱ्यांनी धाडसाने दोघांना वाचवले, ही घटना बुधवारी सायंकाळी उशिरा घडली. दोन्ही तरुणांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहर परिसरातील गणपतींचे मोठ्या प्रमाणात सप्तलिंगी नदीपात्राच्या मच्छी मार्केट परिसरामध्ये विसर्जन होत असते. विसर्जन केलेले गणपती झाडाझुडपांमध्ये कडेला अडकलेले असतात. हे गणपती दुसऱ्या दिवशी खालच्याआळी येथील तरुण एकत्र येऊन पुन्हा पाण्यात विसर्जन करण्याचे काम करतात.

बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खालची आळी येथील तरुण नदीपात्रात उतरून अडकलेले जाळीतील गणपती सोडवण्याचे काम करत होते. एवढ्यातच पाण्याचा मोठा लोंढा आल्यामुळे आशय बारटक्के हा तरुण पट्टीचा पोहणारा असतानाही पाण्यात बुडू लागला. ही बाब सुवारे या तरुणाच्या लक्षात येताच त्याने आशय बारटक्केला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र बारटक्के याने सुवारे याला मिठी मारल्यामुळे सुवारे देखील पाण्यात बुडू लागला.

Drowning incident
Ratnagiri : जिल्ह्यात 2 हजार 47 शेतकर्‍यांचे पीक विमा अर्ज

हे लक्षात येताच तात्काळ सहकाऱ्यांनी दोघांनाही पाण्याबाहेर काढले. यामुळे दोघांचेही प्राण वाचले आहेत. दोघांनाही देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

Drowning incident
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या संघर्षात यशस्वी शिष्टाई

या दोघांचे प्राण वाचल्यामुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या घटनेबाबतची कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नाही. खबरदारी म्हणून सुवारे याला रात्री उशिरा रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news