

रत्नागिरी : प्रधानमंत्री पीक विमा योजना यंदा नव्या स्वरूपात रत्नागिरी जिल्ह्यात लागू झाली असून या योजनेत सहभागी होण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतीनंतर जिल्ह्यातील खरीप हंगामातील भात व नाचणी पिकांसाठी 2 हजार 47 शेतकर्यांनी 542.59 हेक्टर क्षेत्रावरील पिक विम्यासाठी अर्ज केले आहे. त्यापैकी 407 शेतकर्यांनी पीक कर्जासाठी अर्ज दाखल केले तर 1 हजार 640 बिगरकर्जदार शेतकर्यांनी अर्ज दाखल केले आहे.पीक विमासाठी 2.40 लाखांचे मिळणार आहे. सर्वाधिक अर्ज खेड, दापोली, चिपळूण तालुक्यातून आली असून सर्वात कमी लांजा, गुहागर, रत्नागिरी तालुक्यातून आले आहेत.
जिल्ह्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगामासाठी 31 जुलै शेवटची तारीख होती. त्यानंतर प्रतिसाद मिळत नसल्यामुळे 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढी नंतर 2 हजार 47 शेतकर्यांनी पीक विम्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. तर मागील वर्षी कर्जदार, बिगर कर्जदार मिळुन 14 हजार 324 शेतकर्यांनी अर्ज केले होते. मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी पिक विम्यासाठी अर्जाची संख्या वाढली आहे. दरम्यान, या योजनेत सहभागी होण्याासठी अॅग्रीस्टॅग शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असून पीक विमा नुकसानीसाठी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद बंधनकारक आहे. जिल्ह्यातील 83 महसूल मंडलासाठी भात व नाचणी पिकांसाठी ही योजना लागू असून कर्जदार, बिगर कर्जदार शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामातील पिकांपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या उत्पादनात विपरीत परिणाम झाल्यास व इबर बाबींमुळे हंगामच्या शेवटी पीक पेरणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादन आधारे, महसूल मंडलामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादन तुलनेत शेतात घट गृहीत धरून नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.