Dapoli Rescue | विहिरीत पडलेल्या भेकराची वन विभागाकडून यशस्वी सुटका; उपचारासाठी पुण्यात हलविले

दापोली तालुक्यातील खेर्डी-माळवाडी येथील घटना
Dapoli Wildlife Rescue
खेर्डी-माळवाडी येथे विहिरीत पडलेल्या जखमी भेकराची वन विभागाच्या पथकाने सुटका करताना.Pudhari
Published on
Updated on

Dapoli Wildlife Rescue

दापोली : दापोली तालुक्यातील खेर्डी-माळवाडी येथे विहिरीत पडलेल्या एका भेकराची वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी सुटका केली. या दुर्घटनेत भेकराच्या पुढील उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील वन्यजीव रेस्क्यू सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ग्रामस्थ पांडुरंग केळकर यांनी त्यांच्या शेतातील विहिरीत भेकर पडल्याची माहिती दापोली वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने भेकराला सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

Dapoli Wildlife Rescue
Dapoli News : दापोलीकडे अन्‍न-औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

बचावानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत विहिरीतील खडकावर पडल्यामुळे भेकराचा समोरील उजवा पाय गुडघ्याजवळून मोडल्याचे निदर्शनास आले. पशुधन विकास अधिकारी डॉ. मुकुंद लोंढे यांनी प्राथमिक उपचार व तपासणी केल्यानंतर अधिक उपचारासाठी विशेष वाहनातून त्याला पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

ही बचाव मोहीम वनपाल रामदास खोत, वनरक्षक विश्वंभर झाडे आणि वन्यजीवप्रेमी किरण करमरकर यांनी वनक्षेत्रपाल प्रकाश पाटील यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडली. विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कारवाई करण्यात आली.

Dapoli Wildlife Rescue
Dapoli News | परतीचा प्रवास ठरला अखेरचा; दापोलीतील माय-लेकीचा दुर्दैवी अंत

दरम्यान, वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जखमी, अनाथ किंवा संकटात सापडलेले कोणतेही वन्यजीव आढळल्यास तात्काळ 'हॅलो फॉरेस्ट १९२६' या हेल्पलाईनवर किंवा वनक्षेत्रपाल, दापोली कार्यालयाशी संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news