Ratnagiri Crime : फणसवळे-वेतोशी गावच्या जंगलात पुन्हा एकदा गोवंश कत्तलीचा धक्कादायक प्रकार! आरोपींचा पोलिसांवर हल्ला

ग्रामीण पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात, रस्त्‍यावरील बेवारस जनावरांना पाव घालून
Ratnagiri Crime : फणसवळे-वेतोशी गावच्या  जंगलात पुन्हा एकदा गोवंश कत्तलीचा धक्कादायक प्रकार!
Ratnagiri Crime : फणसवळे-वेतोशी गावच्या जंगलात पुन्हा एकदा गोवंश कत्तलीचा धक्कादायक प्रकार!
Published on
Updated on

रत्‍नागिरीः फणसवळे-वेतोशी गावच्या वेशीवरील जंगलात पुन्हा एकदा बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बेकायदेशीर गोवंश कत्तलीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गस्ती दरम्यान या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या ग्रामीण पोलिसांशी तीन संशयितांनी हुज्जत घालत हल्ल्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, एक संशयित पसार झाला आहे.

या धाडीत पोलिसांकडून तीन गोवंशिय जनावरे, इन्होव्हा कार गोवंशीय जनावरांना बेशुध्द करण्यासाठी वापरण्यात येणारी इंजेक्शने व मारण्यासाठी वापरण्यात येणारी हत्‍यारे जप्त करण्यात आली. गुरुवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्‍यांना दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मोहसीन कुरेशी व अस्लम शेख (दोन्ही मुळ रा.मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. तर अन्य एक कुरेशी नामक संशयित हा फरार आहे. जून महिन्यात फणसवळे येथे असाच गोवंशीय हत्‍येचा प्रकार घडला होता. त्‍यानंतर ग्रामीण पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे आणि त्‍यांची टिम या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सातत्‍याने त्‍या परिसरात रात्रीच्या वेळी गाडीचे दिवे बंद करुन गस्त घालत होते.

Ratnagiri Crime : फणसवळे-वेतोशी गावच्या  जंगलात पुन्हा एकदा गोवंश कत्तलीचा धक्कादायक प्रकार!
Ratnagiri News : लांजा शहर परिसरात अनधिकृत खोके, टपऱ्या हटाव मोहीम

बुधवारी रात्रीही ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलिस उपनिरीक्षक अभय तेली,पोलिस हवालदार संकेत महाडिक, सागर साळवी,चालक तेरवणकर यांची टिम त्‍या परिसरात गस्त घालण्यासाठी गेले होते. गस्ती दरम्यान त्‍यांना एक गोवंशिय जनावर कापलेल्या अवस्थेत तर इतर दोन बेशूध्द अवस्थेत दिसून आली. तसेच बाजुलाच झाडीत एक इन्होव्हा कार दिसून आली. कोणीतरी आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून संशयित गाडीत जाउन बसले.

पोलिसांवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्‍न

पोलिसांना पाहून संशयित अस्लम शेखने त्‍यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्‍न केला. पोलिसांनी बाजुला होउन संशयितांच्या गाडीच्या दरवाजांवर धक्के मारल्यानंतर संशयितांनी गाडीबाहेर पडून पळण्याचा प्रयत्‍न केला. तेव्हा पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे आणि पोलिस उपनिरीक्षक अभय तेली व इतर पोलिसांनी संशयितांवर झडप घालण्याचा प्रयत्‍न केला. त्‍यावेळी मोहसिन कुरेशीने संकेत महाडिकवर आपल्याकडील धारदार चाकूने वार करण्याचा प्रयत्‍न करत पळ काढला. या झटापटीत पोलिसांनी अस्लम शेखला अटक केली. पण मोहसिन कुरेशी आणि कुरेशीने अंधाराचा फायदा उठवत जंगलात पळ काढला.

दरम्यान, पोलिसांची अधिकची कुमक मागवण्यात आली आणि जंगलात पथके पाठवून संशयितांचा शोध घेत असताना गुरुवारी सकाळी मोहसिन कुरेशी मिळून आला. संशयित हे सर्व गुन्हे अत्‍यंत सफाईदारपणे कोणताही पुरावा मागे न ठेवता गेले दोन महिने करत होते. संशयित मिरजोळे ते करबुडे जाणाऱ्या रस्त्‍यांवरील उनाड गुरांना पाव खाऊ घालायचे त्‍यानंतर त्‍यांना बेशूध्द होण्याचे इंजेक्शन देउन त्‍यांना कारमधून फणसवळे येथील जंगलमय परिरात आणायचे. त्‍याठिकाणी आपल्याकडील धारदार हत्‍यारांनी ते गोवंशिय प्राण्यांना ठार मारुन त्‍यांचे मांस विक्रीसाठी घेउन जायचे.

गोमांसाची मुंबईला विक्री

संशयितांकडून 40 ते 45 मिनिटांत एका गोवंशिय जनावराचे मांस काढण्यात येत होते. मध्यरात्री 1 ते पहाटे 4 वा.कालावधीत संशयित तीन गोवंशिय जनावरांचे मांस काढून त्‍याची मुंबईला विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना दिली.

इन्होव्हाला बनावट नंबर

संशयितांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या इन्होव्हा कारला बनावट नंबर प्लेट लावण्यात आलेली आहे. या इन्होव्हा कारला लावण्यात आलेल्या नंबर प्लेटवरील नंबर एका रिक्षेचा असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. चौकट - पोलिसांच्या सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नांना यश

जून महिन्यांत फणसवळे येथे गोवंशीय हत्‍येचा गुन्हा घडला होता. आल्यानंतर ग्रामीण पोलिसांकडून त्‍या अनुषंगाने वारंवार तपास सुरु होता. त्‍या परिसरात दररोज एक-दोन तासांनी पेट्रोलिंग करताना ग्रामस्थ,पोलिस पाटील यांना जागृत केले जात होते. अखेर दोन महिन्यांनंतर पोलिसांच्या सातत्‍याने करण्यात येत असलेल्या प्रयत्‍नांना यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news