Ratnagiri Civil Hospital | महिला रुग्णाला महिला सफाई कामगाराने वांती साफ करण्यास पाडले भाग

Ratnagiri Civil Hospital | रुग्ण सेवेतील हा बेजबाबदारपणा जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निदर्शनास आला असून त्या कंत्राटी महिला सफाई कामगारावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Hospital
HospitalPudhari
Published on
Updated on

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा शासकीय रुग्णालयात गर्भ पिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी ॲडमिट असलेल्या साखरपा येथील संगीता पवार या महिलेला झालेली वांती येथील कंत्राटी महिला सफाई कामगाराने त्या रुग्ण महिलेसच स्वच्छ करण्यास भाग पाडले. रुग्ण सेवेतील हा बेजबाबदारपणा जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निदर्शनास आला असून त्या कंत्राटी महिला सफाई कामगारावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Hospital
Minor Girls Protection Home : संरक्षण व काळजीपात्र मुलींसंदर्भात प्रशासनाची निष्काळजी; त्रास दिल्‍या जात असल्‍याचा आरोप

जिल्हा रुग्णालयातील एखाद्या कर्मचाऱ्याच्या बेजबाबदार कृतीमुळे अनेकदा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अधिकारी वर्गाला दुष्परिणाम भोगावे लागले आहेत. अशा बेजबाबदार कार्यपद्धतीचा एकसंघ असतानाच्या शिवसेनेने मुद्दा बनवून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यावेळची शिवसेना स्टाईल दाखवून दिली आहे. त्यामुळे गेल्या शुक्रवारी महिला रुग्णासोबत असाच राग येणारी घटनेची जिल्हा शल्य चिकित्सकांनी गंभीर दखल घेतली आहे.

Hospital
Crime News : शिक्षण उपसंचालकांच्या दालनात अर्धनग्न होऊन स्टंटबाजी

साखरपा येथील एक महिला रुग्ण गर्भ पिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. या महिलेला अचानक वांती झाली. त्यावेळी कामावर असणाऱ्या एका कंत्राटी महिला सफाई कामगाराने आपले कर्तव्य बजावण्याऐवजी त्या रुग्ण महिलेलाच ती वांती साफ करण्यास भाग पाडले. ही घटना लोकप्रतिनिधींना कळल्यानंतर ती जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. त्यामुळे त्या महिला सफाई कामगारावर कारवाईची टांगती तलवार लटकत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news