Ratnagiri News : चिपळुणात घरावर दगड कोसळले

सुदैवाने जीवित हानी टळली, घराचे नुकसान, नगराध्यक्षांकडून पाहणी
Ratnagiri News
चिपळुणात घरावर दगड कोसळले
Published on
Updated on

चिपळूण : शहरातील खेंड बडदेवाडी परिसरात बुधवारी सकाळी एका घरावर दगड कोसळून दुर्घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Ratnagiri News
Ratnagiri News : जिल्ह्यात अंत्योदय लाभार्थींना साखर वाटप

घटनेनंतर संबंधित कुटुंबीयांनी माजी नगरसेवक आशिष खातू यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने ही बाब नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या निदर्शनास आणून दिली. माहिती मिळताच नगराध्यक्ष सकपाळ यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली व कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी संबंधित कुटुंबीयांनी या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची तातडीची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश डांगे यांच्या घराच्या वरच्या बाजूला डोंगरातून चिपळूण नगर परिषदेची मोठी पाण्याची पाईपलाइन गेलेली आहे. या लाईनमधून वारंवार गळती होत असल्याने माती सैल होऊन दगड कोसळण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली. याची दखल घेत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य करत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही कुटुंबीयांना दिली.

Ratnagiri News
Ratnagiri Child Marriage Awareness | बालविवाह हा गंभीर सामाजिक विषय : आर. आर. पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news