Mahashivratri 2026 | देवघर येथे जाधव कुटुंबीयांची महाशिवरात्रीची १२७ वर्षांची अखंड परंपरा

Chiplun Jadhav family | साजरा केला जातो श्री सत्येश्वराचा उत्सव
Devghar Jadhav family 127 years Mahashivratri tradition
जाधव परिवाराचा महाशिवरात्र उत्सव यंदाही भक्तिभाव आणि उत्साहात साजरा Pudhari
Published on
Updated on

Devghar Jadhav family 127 years Mahashivratri tradition

चिपळूण : गुहागर तालुक्यातील देवघर येथे १२७ वर्षांची अखंड आणि अभिमानास्पद परंपरा लाभलेला जाधव परिवाराचा महाशिवरात्र उत्सव यंदाही भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होत आहे.

या पवित्र परंपरेची सुरुवात कै.धोंडबाराव जाधव यांनी साधारण १८९९ साली केली. त्यानंतर कै . श्रीधर जाधव यांनी ही परंपरा अखंडपणे पुढे चालू ठेवली. आज पाचव्या पिढीतील देवघर येथील सर्व जाधव बंधू अत्यंत निष्टेने श्रद्धेने आणि एकोप्याने हा उत्सव पुढे नेत आहेत. ही परंपरा केवळ धार्मिक नसून कुटुंबाच्या ऐक्याची आणि संस्कारांची जिवंत ओळख आहे.

Devghar Jadhav family 127 years Mahashivratri tradition
Mahashivratri 2026: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय आहे संबंध... कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या ज्योतिर्लिंगाची करावी उपासना?

पूर्वापार हा उत्सव सात दिवस चालतो. या सात दिवसांत दररोज भजन आणि कीर्तनाचा मंगलमय कार्यक्रम होतो. अखंड परंपरेनुसार कापरे मोरे वाडी येथील भजन मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी आपले भजन सादर करून उत्सवात सहभागी होतात. तसेच झोंबडी तावडे वाडी येथील मंडळींचाही सहभाग असतो.

पूर्वी बोरगाव, कात्रोली, गुढे व आसपासच्या गावांतील भजन मंडळी एक तासाची बारी घेऊन उत्सवात सहभागी होत असत. त्यामुळेच देवघर व आजूबाजूच्या परिसरात जाधव घराण्याचे संबध अधिक दृढ झाले तसेच त्यामुळेच त्या काळातील सामूहिक भक्ती आणि गावागावांतील ऐक्य आजही प्रेरणादायी आहे.

Devghar Jadhav family 127 years Mahashivratri tradition
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला राशीनुसार शिवलिंगाला कोणता अभिषेक करावा?

आजही देवघर व निर्व्हाळ येथील संपूर्ण जाधव परिवार, तसेच नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा श्रद्धा, संस्कार आणि सामूहिक एकतेचे प्रतीक आहे.

महाशिवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून जाधव परिवाराच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि एकोप्याचा अभिमानास्पद वारसा आहे. या उत्सवात या देवाची पूजा अर्चा करणारे कृष्णा गुरव यांचा वाटा खूप मोलाचा आहे. त्यांच्या घराण्यातील ४ पिढ्या या देवाची अखंड सेवा करत आहेत. अशी ही परंपरा अखंड आणि तेजस्वी राहण्यासाठी जाधव कुटुंबीय मनोभावे सेवा करत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news