Lanja Ratnagiri water crisis - बेनिखुर्द धरणाचा पाणीसाठा खालावला !

लांजा शहरातील नागरिकांसह परिसराला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार
 बेनिखुर्द धरण
बेनिखुर्द धरण
Published on: 
Updated on: 

लांजा : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा कमी पाऊस आणि 'एल निनों'च्या प्रभावामुळे तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढावल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. लांजा शहर व तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांची तहान भागवणारे बेनिखुर्द चे धरण यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच कपातिकडे जाऊ लागल्याने लांजा शहर व परिसरावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ७७ टक्के म्हणजे सुमारे २,४३७ मिमी पाऊस पडला असून काही वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण सर्वात कमी राहिले आहे. यामध्ये लांजा तालुक्यात ७०.८० टक्के इतका पाऊस पडला. तालुक्यांमध्ये दरवर्षी पावसाचे प्रमाण जास्त असते. मात्र, यावर्षी हे प्रमाण खूप कमी झाले आहे. याचा परिणाम भूजलपातळीवर झाला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणी साठा कमी राहिला आहे. लांजा तालुक्यात धरणांची एकप्रकारे चळवळ सुरू असली तरी यावर्षी पाणी पाणी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. सध्या लांजा तालुक्यामधे एकूण तेरा धरणे असून यामध्ये खोरणीनको, वेरवली बेर्डेवाडी, बेनिखुर्द, केळंबे-खेरवसे, झापडे, कोंडये, शिपोशी, कुवे, व्हेळ, गवाणे, पन्हळे, हर्दखळे या गावांमध्ये धरणे व पाझर तलावांमध्ये पाणी साठा केला गेला आहे.

मात्र वाढत्या उन्हाचा कडाका आणि कमी झालेले पावसाचे प्रमाण यामुळे पाणी धरणे व अन्य जलसाठ्यांमध्ये कमालीची कपात होऊ लागली आहे. धरणांमधील पाणीसाठा ३ टक्क्यांनी कमी होऊन ७५ टक्क्यांवर आला आहे.

भूजल पातळीत घट होत असल्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईचे सावट आहे. संभाव्य भीषण पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी तालुका प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन आणि पाणीसाठा बचत बाबत सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात जलस्रोतांचे संवर्धन आणि वनराई बंधाऱ्यांवर भर दिला गेल् आहे. ग्रामीण व दुर्गम भागा पिण्याच्या पाण्याची उपलब्धता काय ठेवण्यासाठी आतापासूनच नियोज होणे काळाची गरज निर्माण झाल् आहे. वाहून जाणारे पावसाचे पाण अडवण्यासाठी लहान बंधारे बांधण्या आले असले तर पाण्याचे नियोज महत्वाचे ठरणार आहे.

लांजा तालुक्यात पाणी टंचा मात करण्यासाठी ग्रामीण भागाती धरणे परिसरातील जलस्रोत काय ओलिताखाली आणत असतात. धरणांचे पाणी कपातीकडे जा असल्याने चिंतेची बाब ठरत आहे लांजा शहरासह पश्चिमेकडील गावांन मुबलक पाणीपुरवठा करणारे बेनिखु येथील धरणाचा पाणीसाठा सहा खालावत आहे. पाणीसाठा मुबलक असणारे बेनिखुर्दच्या धरणाच पाणीसाठा नोव्हेंबरातच झपाट्या कमी होऊ लागल्यामुळे लांजा शहर परिसरातील गावांना यावेळी पाण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

 बेनिखुर्द धरण
Ratnagiri | स्वच्छतेत रत्नागिरी किनारपट्टी देशात तिसरी!

लांजा शहरासह पश्चिम भागातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बेनिखुर्द धरणाचा जलसाठा नोव्हेंबर महिन्यातच खालावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे सावट उद्भवण्याची शक्यता आहे.

 बेनिखुर्द धरण
Ratnagiri Airport| रत्नागिरी विमानतळाच्या विकासाला १०.६७ कोटींचे बळ!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.