Ratnagiri Accident | भोस्ते घाटात भीषण अपघात; कंटेनर ट्रक संरक्षण भिंतीवर आदळला, दोघे गंभीर

Ratnagiri Accident | भोस्ते घाटात भीषण अपघात; कंटेनर ट्रक संरक्षण भिंतीवर आदळला, दोघे गंभीर
Ratnagiri Accident
two injured in Ratnagiri Accidentpudhari photo
Published on
Updated on
Summary

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात अपघातांची मालिका सुरूच असून, आज एका भरधाव कंटेनर ट्रकचा भीषण अपघात झाला. घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक थेट रस्त्याशेजारील संरक्षक भिंतीवर जाऊन आदळला. हा आघात इतका जोरदार होता की ट्रकच्या कॅबिनचा चक्काचूर झाला असून, यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

two injured in Ratnagiri Accident

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनर ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट घाटातील संरक्षण भिंतीवर आदळला. धडक इतकी जोरदार होती की, ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला असून वाहन अर्धवट हवेत लटकलेल्या अवस्थेत अडकून राहिले.

Ratnagiri Accident
Ratnagiri News| जिल्ह्यातील १०५७ शिक्षकांना मिळणार जिल्ह्यातच संधी !

या अपघातात ट्रकमधील दोघेजण गंभीर जखमी झाले. धडकेनंतर चालकासह अन्य एक जण ट्रकमध्येच अडकून पडले होते. यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी, प्रवाशांनी तसेच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी तत्परतेने मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच मदत ग्रुप आणि जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थेची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित जवळील रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Ratnagiri Accident
Ratnagiri News | शालेय पोषण आहार, तपासणीसह खर्चाचा हिशेब होणार

दरम्यान, अपघातग्रस्त कंटेनरमध्ये शीतपेय असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news