जहाज दुर्घटनेत कसब्यातील तरुणाचा मृत्यू झाला.
जहाज दुर्घटनेत कसब्यातील तरुणाचा मृत्यू झाला.

रत्नागिरी : ओमानमधील जहाज दुर्घटनेत कसब्यातील तरुणाचा मृत्यू

ओमान किनार्‍यावरील शिप प्रेस्टिज फाल्कन दुर्घटना

देवरूख : ओमानमधील जहाज दुर्घटनेत संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील युवक समरान इब्राहिम सय्यद यांचा मृत्यू झाल्याची माहिती ओमान कंपनीने गुरुवारी कुटुंबीयांना कळवली आहे. यामुळे कसबा गावात शोककळा पसरली. ओमान किनार्‍यावरील शिप प्रेस्टिज फाल्कन दुर्घटनेत समरान इब्राहिम सय्यद (रा. कसबा-पारकर वाडा) याचे गुरुवारी रुग्णालयात निधन झाल्याचे कंपनीकडून कळवण्यात आले. दोन महिन्यापूर्वीच समरान इब्राहिम सय्यद हा ओमान मध्ये बोटीवर कामासाठी गेला होता. ओमान समुद्रात बुडालेल्या 13 भारतीयांमध्ये त्याचा समावेश होता.

जहाज दुर्घटनेत कसब्यातील तरुणाचा मृत्यू झाला.
रत्नागिरी : तरूणीचे अश्लिल फोटो व्हायरल करणाऱ्या तरूणाला अटक

बोट उलटल्याच्या दुर्घटनेनंतर भारतीयांसह इतर लोकांचा शोध लागलेला नव्हता. यात इतर तीन क्रू मेंबर्स श्रीलंकेचे होते. समरानच्या कुटुंबियांना प्रथम जहाज बुडाल्याने कंपनीकडून कळवण्यात आले होते. यानंतर गुरुवारी कंपनीने समरानचे निधन झाल्याची माहिती कळवली. यामुळे समरानच्या कुटुंबासह कसबा गावावर शोककळा पसरली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news