Ration Rice Replacement Maharashtra: रेशनमध्ये मक्याची एन्ट्री; कोकणात मात्र तांदूळ-गहूच कायम

राज्य शासनाचा तांदळाऐवजी मका देण्याचा निर्णय; रत्नागिरी जिल्हा वगळला, लाभार्थ्यांना पूर्ववत धान्य वितरण
Ration card verification Maharashtra 2025
Ration Rice ReplacementPudhari
Published on
Updated on

रत्नागिरी : रेशनिंग प्रणालीतील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब राज्यातील रेशन कार्डधारकांना तांदळाऐवजी मका देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे मार्च महिन्यात लाभार्थ्याना मका मिळण्याची शक्यता आहे.

Ration card verification Maharashtra 2025
Mazi Vasundhara 5.0 Award: पनवेलचा हरित मानाचा तुरा; ‘माझी वसुंधरा 5.0’ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक

रत्नागिरी जिल्ह्यात भात पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत असल्याने रेशनकार्ड धारकांना मिळणाऱ्या धान्यात बदल न करता तांदूळ, गहूच मिळणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. रत्नागिरी जिल्ह््यासह कोकणात तांदूळ, गहूच वितरण होणार आहे. मका हे धान्य स्थानिक पातळीवर वापरले जात नाही. त्यामुळे रेशन दुकानांवर त्याचे वितरण करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

Ration card verification Maharashtra 2025
SGNP Slum Rehabilitation: वन जमिनीवरील झोपडीधारकांची कागदपत्रांसाठी धावपळ; पात्रता निश्चिती प्रक्रियेला वेग

शासनाच्या निर्णयातून रत्नागिरी जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना रेशन दुकानांतून नेहमीप्रमाणे गहू आणि तांदूळ यांचेच वितरण केले जाणार आहे.

Ration card verification Maharashtra 2025
Kolhapur Zilla Parishad: कोल्हापूर जिल्ह्यावर वर्चस्वासाठी भाजपची आक्रमक चाल

रेशनदुकानात तांदूळ ऐवजी मका मिळणार याबाबतीचा निर्णय, पत्रक रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागास मिळालेले नाही. तसा निर्णय रत्नागिरी जिल्ह्यासाठी झालेला नाही. लवकरच गहू, तांदूळ येणार असून लाभार्थ्याना वितरीत करण्यात येईल.

रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news