Ramdas Kadam on Sanjay Kadam | आठ दिवसांत जाहीर माफी मागा, अन्यथा...: रामदास कदमांचा संजय कदमांना इशारा

दिलीप खेडकर यांच्याशी संबंधावरून रामदास कदमांचे उत्तर
 Ramdas Kadam on Sanjay Kadam
माजी मंत्री रामदास कदम यांनी माजी आमदार संजय कदम यांना उत्तर दिले आहे. Pudhari News Network

खेड; पुढारी वृत्तसेवा : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्यासोबत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे देखील एसीबीने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आ. संजय कदम यांनी शुक्रवारी (दि.१९) पत्रकार परिषदेत केली होती. आता यावर कदम यांनी उत्तर दिले आहे. आठ दिवसांत जाहीर माफी मागा, अन्यथा अब्रु नुकसानीच्या दाव्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा कदम यांनी आज (दि.२०) दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

 Ramdas Kadam on Sanjay Kadam
IAS Pooja Khedkar | पूजाचे वडील दिलीप खेडकरसोबत रामदास कदमांची चौकशी करा

रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप

दिलीप खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी असताना ते सतत खेडमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये असायचे आणि खेड हे त्यांचे वसुलीचे ठिकाण होते. ज्याच्या ठिकाणी ते क्लोजर चे नोटीस द्यायचे. त्या त्या ठिकाणी मंत्र्यांची नावे सांगायचे जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी असलेल्या लोटे एमआयडीसीमध्ये त्यांचे मुख्य ठिकाण होते. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि त्यांच्यात आर्थिक हितसंबंध होते. त्यामुळे त्यांच्या सोबतच रामदास कदम यांची देखील चौकशी करावी, अशी मागणी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत केली होती.

 Ramdas Kadam on Sanjay Kadam
रामदास कदम आघाडीतील सूर्याजी पिसाळ : संजय कदम

प्रसिद्धी मिळवायची हे संजय कदम यांचे धंदे

तर संजय कदमांचा समाचार घेताना रामदास कदम यांनी आपल्यावर केलेले आरोप हे खोडसाळ आणि खोटे असून संजय कदमांनी येत्या आठ दिवसांत जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांनी अब्रु नुकसानीच्या दाव्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला. इतक्या वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत कधीही असे प्रकार केले नसून मंत्र्यांचा आणि बदल्यांचा संबंध येत नाही. आपल्यावर बिनबुडाचे आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची हे संजय कदम यांचे धंदे असल्याचे त्यांनी सांगितले.

 Ramdas Kadam on Sanjay Kadam
पर्यटन व्यावसायिकांच्या मानेवर किरीट सोमय्यांचे भूत : संजय कदम

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news