

Ajit Pawar Plane Crash
खेड : बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या विमान अपघाताची तात्काळ व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी (दि.३०) माध्यमांसोबत बोलताना केली आहे.
रामदास कदम म्हणाले, सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर असताना विमान अपघातात मृत्युमुखी पडणे ही अत्यंत धक्कादायक घटना आहे.
या अपघातामागील नेमकी कारणे आणि सत्य जनतेसमोर आले पाहिजे. सकाळी ८ ते ८.३० वाजता विमान उतरत असताना वैमानिकाला नक्की कोणत्या अडचणी आल्या हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे अपघाताच्या मागील कारणांची अधिक स्पष्ट होणे गरजेचे आहे. अन्यथा नेत्यांचा विमान प्रवास हा असुरक्षिततेचे साधन ठरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
राज्यासह केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांनी या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अपघाताच्या चौकशीबाबत विविध स्तरातून मागण्या होत आहेत.