Rajapur Theft News | राजापूरमध्ये एकाच रात्रीत पाच घरफोड्या, लंपास झाले सात लाखांचे मालमत्ता!

Rajapur Theft News | राजापूरमध्ये मोठी घरफोडी झाल्याने पुन्हा एकदा चोरट्यांनी तालुक्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
Rajapur News
Rajapur NewsPudhari Online
Published on
Updated on

Rajapur Theft News

राजापूर: राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीसह बौद्धवाडी आणि मधलीवाडी येथील अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच घरं फोडून अंदाजे सात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याने स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी मध्यरात्री ही चोरी झाल्याने राजापूर पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Rajapur News
Monsoon Hair Care Tips | पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी? जाणून घ्या सविस्तर

चोरट्यांनी कोंड्ये हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक महाडेश्वर, ॲड. मुरलीधर मोरे, योगेश मोरे, शशिकांत लाड आणि अविनाश रामचंद्र तावडे यांच्या घरांमध्ये प्रवेश केला. चोरीची माहिती मिळताच राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली.

Rajapur News
Goa GMC Doctors Protest |आरोग्यमंत्र्यांकडून जाहीर माफीची अपेक्षा! गोमेकॉ च्या डॉक्टरांची मागणी

राजापूरमध्ये दीर्घ कालावधीनंतर अशी मोठी घरफोडी झाल्याने पुन्हा एकदा चोरट्यांनी तालुक्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. पाच घरांची एकाच रात्री फोडणी करून चोरट्यांनी पोलिसांसमोर गंभीर आव्हान निर्माण केले आहे. आता राजापूर पोलिसांनी या चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, चोरट्यांचे ठोस पुरावे मिळवणे आणि मुद्देमाल सापडणे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news